सर्व चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकला- निहलानी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई : नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर होणारे नुकसान टाळण्यासाठी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलावे, असे आवाहन चित्रपट परीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्ड) अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिग्दर्शक व निर्मार्त्यांना केले आहे.

नोव्हेंबरमध्ये शाहरूख खान आणि आलिया भट यांचा "डिअर जिंदगी', तर डिसेंबरमध्ये "कहानी-2', "बेफिक्रे', "दंगल' हे मोठ्य बॅनरचे चित्रपट झळकणार आहेत. नोटाबंदीमुळे चित्रपट व्यवसायावर दुष्परिणाम झाला आहे. ऑनलाइन तिकिट विक्री होत असली, तरी तिचे प्रमाण 20 ते 30 टक्‍केच आहे. बहुतांश सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये रोख पैसे घेऊनच तिकीटविक्री केली जाते. शिवाय सध्या रोजचा खर्च जपून करणारे प्रेक्षक चित्रपटावर खर्च करत नसल्याचे निदर्शनास येते आहे. त्याचाही परिणाम चित्रपटांच्या गल्ल्यावर झाला आहे, असे पहलानी यांनी सांगितले.

Web Title: nihlani demands to postpone film releases