esakal | 'भावानंतर सतावतेय आई - वडिलांची काळजी'
sakal

बोलून बातमी शोधा

nikki tamboli

'भावानंतर सतावतेय आई - वडिलांची काळजी'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रभाव सर्वांसाठी चिंताजनक ठरताना दिसत आहे. बॉलीवूडमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत आहे. अभिनेत्री आणि मॉडेल निक्की तांबोळीच्या (nikki tamboli) भावाचे कोरोनामुळे निधन झाले. आता तिला तिच्या आई वडिलांची काळजी सतावत आहे. निक्कीनं (nikki tamboli) सोशल मीडियावर त्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या त्या पोस्टला चाहत्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. काल आणखी एका अभिनेत्रीला आपल्या भावाला कोरोनामुळे गमवावं लागल्याचे समोर आले आहे. तिनंही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. निक्कीच्या आई वडिलांनाही कोरोनानं ग्रासलं आहे. त्यामुळे तिला आता त्यांची काळजी वाटू लागली आहे.

निक्कीनं (nikki tamboli) सोशल मीडियावर जी पोस्ट शेअर केली आहे त्यात तिनं असं म्हटलं आहे की, मला त्यांच्या चेह-यावर पुन्हा एकदा आनंद पाहायचा आहे. ते सध्या मोठ्या अडचणीत आहे. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांची काळजी सतावत आहे. देव त्यांना वेदना सहन करण्याची शक्ती देवो हीच त्याच्याकडे प्रार्थना. मला आशा आहे की, तुम्ही दोघेजण लवकरच पुन्हा बरे होऊन घरी याल. मला कल्पना आहे की, ते दोघेजण कोणत्या प्रसंगातून जात आहेत. याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाला गमावले आहे.

निक्कीच्या (nikki tamboli) भावाचे जतिनचे मंगळवारी कोरोनानं निधन झाले होते. त्याविषयीची माहिती देणारी पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तिनं असं म्हटलं होतं की, माझा 29 वर्षांचा भाऊ गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याला फुफ्फुसांचा एक आजार झाला होता. त्या दरम्यानच्या काळात त्याला इन्फेक्शन झाले. अखेर त्याला त्याचा जीव गमवावा लागला. निक्कीनं तिच्या भावासाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली होती.

हेही वाचा: गायक लकी अलीच्या निधनाच्या चर्चांवर मैत्रिणीचा खुलासा

हेही वाचा: दीपिका पदुकोणला कोरोना; कुटुंबीयांना भेटायला गेली होती बेंगळुरूला