"नाईन ओ क्‍लॉक' 24 फेब्रुवारीला 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

नक्षलवाद्यांवर आधारित चित्रपट 
मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये सत्य घटनांवर आधारित किंवा त्यांच्याशी निगडित चित्रपटांची लाटच आली आहे. दिग्दर्शक अमृत राज ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला "नाईन ओ क्‍लॉक' 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्याचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. या वेळी चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले अरुण बक्षी, निर्माता गौरव शंकर, गायिका प्रियांका सिंह आणि रानी हजारिका उपस्थित होते. हा चित्रपट नक्षलवाद्यांवर आधारित आहे. 

अभिनेते अरुण बक्षी म्हणाले, की देशात 1967 मध्ये नक्षलवादाची सुरुवात झाली. तेव्हा नक्षलवाद्यांशी जोडले गेलेले लोक एका ध्येयासाठी लढत होते. ते जुलमी जमीनदारांविरुद्ध लढत असत; मात्र नंतर लढ्याचे स्वरूप बदलत गेले. मी या चित्रपटात तरुण पिढी संपवण्याच्या मार्गावर असणाऱ्या नसीमची भूमिका साकारत आहे. 
एका जंगलात संशोधनासाठी गेलेले 10 तरुण नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडतात. त्यांची ही रहस्यमय कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. तेजस फिल्मस्‌ बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine o'clock hindi movie 24 FEb 2017