'अय्यारी' चित्रपटात जमणार मनोज सिद्धार्थची जोडी

टीम ई सकाळ
गुरुवार, 15 जून 2017

बेबी, एम. एस. धोनी असे एकापेक्षा एक चित्रपट देणारे नीरज पांडे आता एका नव्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. या नव्या सिनेमाचे नाव अय्यारी असे असून यात मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे मुख्य भूमिकेत आहेत.

मुंबई : बेबी, एम. एस. धोनी असे एकापेक्षा एक चित्रपट देणारे नीरज पांडे आता एका नव्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. या नव्या सिनेमाचे नाव अय्यारी असे असून यात मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे मुख्य भूमिकेत आहेत.

या सिनेमाचे पहिले शेड़्युल काश्मीर येषे पार पडले. या सिनेमाची गोष्ट सत्य घटनेवर आधारलेली असून यात मनोज आणि सिद्धार्थ दोघेही सैनिकाच्या भूमिकेत आहेत. यात मनोज हे गुरु तर सिद्धार्थ हा शिष्य बनला आहे. याचा पहिला फोटो आज या टीमने सोशल साईटवर टाकला. आता सिनेमाचे शूट दिल्ली व परिसरात सुरु असून काही भाग लंडन आणि ओमान येथे शूट केला जाणार आहे. 

Web Title: Niraj pande new film ayyari esakal news