
गडकरींनी बघितला 'झुंड', नागराज मंजुळेंचं केलं तोंडभरून कौतुक
नागपूर : नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेला झुंड (Jhund Movie) चित्रपट सध्या गाजतोय. पण, या चित्रपटावरून सोशल मीडियावर देखील वाद रंगलेला पाहायला मिळतोय. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळात वेळ काढून झुंड चित्रपट पाहिला आणि नागराज मंजुळे यांचं तोंडभरून कौतुक केलंय. (Nitin Gadkari on Jhund Movie)
हेही वाचा: Jhund: #झुंड_पे_बोल_ट्विटरवर ट्रेंड,झुंड वर मराठी सेलिब्रिटी गप्प का?;मराठी इंडस्ट्रीतून कौतूक नाहीच
नितीन गडकरींचे नागपुरात अनेक कार्यक्रम होते. त्यामधून वेळ काढून त्यांनी झुंड चित्रपट बघितला. यावेळी त्यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं तोंडभरून कौतुक केलं. नागराज मंजुळे हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. त्यांनी सैराट सारखा चांगला चित्रपट केला. त्यांना मी प्रशस्तिपत्र देण्याची गरज नाही. यापूर्वीच फिल्म इंडस्ट्रीने त्यांना त्यांच्या कार्याचे प्रमाणपत्र दिले आहे. झुंड ही अत्यंत सुंदर कलाकृती आहे. लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. त्यांनी छोट्या कलाकारांना मोठी संधी दिली. आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी नागराज मंजुळेचं कौतुक केलं.
सोशल मीडियावर वाद -
नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटानं मराठी चित्रपट सृष्टीतील प्रस्थापितांना मागे टाकले, असं म्हणत नागराज यांच्या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. त्यानंतर काही लोकांनी उच्च वर्णीयांचा इतकाच राग होता, तर अमिताभ बच्चन यांना चित्रपटात कशाला घेतले? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर आता स्वतः नितीन गडकरी यांनी झुंड चित्रपटाचे कौतुक केले आहे.
झुंड चित्रपट हा नागपुरातील फुटबॉल कोच विजय बारसे यांच्यावर आधारित आहे. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी विश्वापासून दूर करण्यासाठी त्यांच्यामध्ये फुटबॉलची आवड निर्माण केली. त्यांच्या स्लम सॉकर ही नवी संकल्पना उदयास आणली. अमिताभ बच्चन यांनी बारसे यांची भूमिका साकारली.
Web Title: Nitin Gadkari Praised Nagraj Manjule Jhund Movie
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..