निया शर्माची बॉलीवूडमध्ये एन्ट्री 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका "जमाई राजा'मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री निया शर्मा बोल्ड छायाचित्रांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. निया "खतरो के खिलाडी' या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे तिचे फॅन फॉलोईंग खूप आहेत.

म्हणे आता ती बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारेय. तेही विक्रम भट यांच्या थ्रिलर सिनेमातून. सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रम भट यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्‍टसाठी नियाची निवड केली आहे. सध्या ती त्यांच्याच "ट्‌विस्टेड' या वेब सीरिजमध्ये काम करतेय. विक्रम भट यांचा हा आतापर्यंतचा वेगळा चित्रपट आहे. यात नियाचा लूकही खूप वेगळा असून ती या लूकची तयारी करतेय. निया शर्माचा लूक व रोल जाणून घेण्याची उत्सुकता आता तिच्या चाहत्यांना लागून राहिलीय.

Web Title: niya sharma starts career in Bollywood