अंबानींच्या सोहळ्यात कॅमेऱ्याला पोझ देत निघून चाललेली शाहरुखची फॅमिली, सलमाननं एकच आवाज दिला अन्... NMACC Opening ceremony | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMACC Opening Ceremony

Video Viral: अंबानींच्या सोहळ्यात कॅमेऱ्याला पोझ देत निघून चाललेली शाहरुखची फॅमिली, सलमाननं एकच आवाज दिला अन्...

NMACC Opening Ceremony : मुंबईत शुक्रवारची रात्र खूपच खास होती. बिझनेस वर्तुळातील टॉप बिझनेसमनपासून मनोरंजन क्षेत्रातील ग्लॅमरस सेलिब्रिटींपर्यंत तसंच क्रिडा जगतातील दिग्गजांपर्यंत सारेच एका प्लॅटफॉर्मवर आले होते. हा सोहळा काही साधारण सोहळा नव्हता,हा होता अंबांनींचा सोहळा..जो ऑर्गनाईज केला होता ईशा अंबानीनं.

निमित्त खास होतं. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' च्या उद्घाटनाला बॉलीवूडच्या तारे-तारकांनी सोहळ्याला चारचॉंद लावले. या सोहळ्याला खुद्ध मुकेश अंबानी यांची मुलगी आणि रिलायन्स रिटेल वेंचर्स लि. मि ची डायरेक्टर ईशा अंबानीनं होस्ट केलं होतं. या सोहोळ्याचे अनेक व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

त्यातील एका व्हिडीओत शाहरुख खानच्या फॅमिलीसोबत सलमान खान पोझ देताना दिसत आहे आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.(NMACC Opening Ceremony Video Viral Salman poses with shahrukh family)

पापाराझी विरल भयानीनं या सोहळ्याचे अनेक सुंदर व्हिडीओ शेअर केले आहेत,ज्यात गौरी खान,सुहाना खान आणि आर्यन खान सोबत सलमान खान पोझ देताना व्हिडीओत दिसला अन् त्या व्हिडीओवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या.

या व्हिडीओत गौरी खान आपली दोन मुलं आर्यन आणि सुहानासोबत कॅमेऱ्याला पोझ देताना दिसत आहे आणि जसं ते कॅमेऱ्यासमोरुन निघून जातायत त्याचवेळी सलमान खान तिथे येतो. आणि त्यानंतर शाहरुखचं अख्खं कुटुंब पुन्हा सलमान सोबत त्याच्या एका हाकेवर फोटो काढण्यासाठी उभे राहतात. आणि पापाराझीला फॅमिली फ्रेंडसोबत एक छान पोझ देतात.

हेही वाचा: महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

या व्हिडीओवर सलमान आणि शाहरुख खान चे चाहते जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. या सोहोळ्यात शाहरुख खान नजरेस पडला नाही पण सलमान सोबत त्याच्या फॅमिलीला एकत्र पाहिल्यावर लोकांना मात्र खूप आनंद झाला आहे. पुन्हा एकदा सलमान आणि शाहरुख मधील मैत्रीचं बॉन्ड इथे दिसलं. हा व्हिडीओ पाहून सलमान खान आणि आर्यनच्या पोझवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.