नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वाद; मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे मौन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

मुंबई :  'आशिक बनाया अपने' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटल्या; मात्र मराठी चित्रपटसृष्टीने यावर मौन बाळगणेच पसंत केले आहे. यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मराठीतील काही कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. 

नाना पाटेकरांची मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख आहे. 'नटसम्राट' या चित्रपटात पाटेकर यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याशी संपर्क साधला. ती म्हणाली, 'नाना सर मला वडिलांसारखे आहेत. त्यांचा मी सेटवर अनेक वेळा ओरडा खाल्ला आहे. काम नीट झाले नाही तर ते मला अनेकदा फोन करूनही सांगत; मात्र तनुश्री हिच्यासारखा कोणताही अनुभव मला आतापर्यंत आलेला नाही.' अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. 

तसे काहीच घडले नाही : राकेश सारंग 
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग म्हणाले, की माझ्या माहितीप्रमाणे तरी तनुश्री दत्ता सांगते तसे सेटवर काही घडलेच नव्हते. सेटवर 400 ते 500 लोक होते. 200 ते 250 ज्युनियर आर्टिस्टही होते. असभ्य वर्तन करायचे कुणी ठरवलेच, तर तो एवढ्या लोकांसमोर असे काम करणार नाही. मुळात असे काही घडलेच नाही. एखाद्या विरोधात बोलण्याआधी त्याने वाईट कृत्य केले आहे, हे आम्हाला दिसले पाहिजे. तसे आम्हाला कधीच दिसले नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No comments by Marathi Actors on Nana Patekar tanushree dutta controversy