नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "रायरंद'ला बहुमान 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थितांनी दिली दाद 
मुंबई :  नोएडा येथे नुकत्याच झालेल्या "चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'त "रायरंद' चित्रपटाला "विशेष एक्‍सलन्स पुरस्कार' मिळाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश पोपट ननावरे यांनी केले असून लेखन आशीष अशोक निनगुरकर यांनी केले आहे. प्रदर्शनापूर्वीच "रायरंद' चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग झाले त्या वेळी मान्यवरांनी त्याला दाद दिली. 

नोएड येथील चित्रपट महोत्सवात मिळालेल्या पुरस्काराबद्दल "रायरंद' चित्रपटाचे लेखक आशीष निनगुरकर म्हणाले की, "नोएडा फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद होत आहे. भरकटत चाललेल्या समाजाला जागे करायचे असेल, तर सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे. मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक आशय लोकांपर्यंत पोहोचवता येतो. त्यामुळे बालमजुरीसारखा गंभीर विषय "रायरंद' चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.' न्यू टॅलेंट सर्च मुव्हीजची निर्मिती असलेल्या "रायरंद'चे संपूर्ण चित्रीकरण नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे झाले आहे. जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी चित्रपटात अभिनय केला आहे. "रायरंद' या चित्रपटात बहुरूपी व बालमजुरी यांच्या जीवनावर भाष्य केले आहे. श्रीरामपूरचे कलावंत श्‍यामकुमार श्रीवास्तव यांनी मुख्य "रायरंद'ची भूमिका साकारली आहे; तर अभिनेता आनंद वाघ या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिकेत आहेत. गीतलेखन भावेश लोंढे व आशीष निनगुरकर यांचे आहे. 
या चित्रपटात अनंत जोग, रणजित कांबळे, श्‍यामकुमार श्रीवास्तव, आशीष निनगुरकर, करण कदम, आनंद वाघ, अजित पवार, प्रवीण भाबळ, सुनील जैन, सुरेश दाभाडे, रेखा निर्मळ, गोरख पठारे, झाकीर खान, राजू ईश्वरकट्टी, नाना शिंदे, संतोष चोरडिया, स्वप्नील निंबाळकर, फिरोज खान, सुभाष कदम व अनुराग निनगुरकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश पोपट ननावरे असून कॅमेरामन राजेश वाव्हळ, कला-दिग्दर्शक सुभाष कदम, संगीतकार विकास जोशी, कार्यकारी निर्माते भावेश लोंढे व सहकारी अमेय शेणवी व प्रतिश सोनवणे असून संकलक व पोस्ट प्रॉडक्‍शन हेड अजित देवळे आहेत. 

Web Title: Noida international film festival