
Nagraj Manjule: सैराट मध्ये "ही" अभिनेत्री साकारणार होती आर्ची.. पण ऐनवेळी.. नागराजने केला मोठा खुलासा
Ghar Banduk Biryani Nagraj Manjule News: घर बंदूक बिरयानी सिनेमा सध्या चर्चेत आहे. नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर या तिघांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.
नागराज मंजुळे घर बंदूक बिरयानी सिनेमाच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. यानिमित्ताने अनेक ठिकाणी बोलताना नागराज सैराट, फॅन्ड्री सिनेमांच्या आठवणी शेयर करत आहेत.
नागराज मंजुळे यांचा सैराट सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. या सिनेमात आकाश ठोसर, रिंकू राजगुरू या दोघांनी अनुक्रमे परश्या आणि आर्चीची भूमिका साकारली होती. रिंकूने साकारलेली आर्ची प्रचंड लोकप्रिय झाली.
पण सैराट साठी रिंकू नाही तर एका वेगळया अभिनेत्रीची निवड झाली होती. सगळं काही जुळून आलं होतं पण ऐनवेळी या अभिनेत्रीची रिप्लेसमेंट झाली. हि अभिनेत्री म्हणजे सायली पाटील.
सायली घर बंदूक बिर्याणी निमित्ताने मराठी सिनेमात पदार्पण करतेय. सायलीने एका मुलाखतीत हा खुलासा केला. सायली तेव्हा कॉलेजला शिकत होती.
त्यावेळी नागराज अण्णांनी सायलीची आर्चीच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतली होती. चार पाच वेळा सायलीची ऑडिशन झाली. पुढे नागराज अण्णांनी सायलीची सैराट मधल्या आर्चीसाठी निवड केली होती पण...
पण सायलीनेच नागराज सरांना नकार दिला. त्यावेळी सिनेमात काम करून अभिनय करण्यासाठी सायली इतकी उत्सुक नव्हती. त्यामुळे सायलीने सैराट साठी काम केलं नाही. सायलीने सैराट सिनेमाची ऑफर नाकारली.
पुढे सैराट - आर्ची आणि रिंकू राजगुरू तिघेही सुपरहिट ठरले. पण सायलीला याचं दुःख नाही. नागराजने ४ वर्षांनी सायलीची झुंड साठी निवड केली.
आणि आता सायली नागराज आणि आकाश ठोसर सोबत घर बंदूक बिरयानी सिनेमात अभिनय करतेय.
घर बंदूक बिरयानी सिनेमात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील याच्या प्रमुख भूमिका आहेत.
आशेच्या भांगेची नशा भारी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे. घर, बंदूक आणि बिरयानीचा याच्याशी नेमका काय संबंध, याचे उत्तर प्रेक्षकांना ७ एप्रिल रोजी मिळणार आहे.