
भारतातील काही टॉपच्या वेबसिरिजची लिस्ट नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये सुप्रसिद्ध वेब सिरिज 'सेक्रेड गेम्स' दुसऱ्या स्थानावर आहे. जाणून घ्या कोणत्या वेब सिरिजने पहिल्या क्रमांकाच स्थान पटकावलं आहे.
फ्लॅशबॅक 2019 : टेलिव्हिजन नंतर आता इंटरनेटचं वर्चस्व गेल्या काही वर्षांमध्ये वाढलं आहे. त्यामुळे मनोरंजनाच्या व्याख्येचं स्वरूपही बदलत आहे. वेब सिरीज हा प्रकार आता भारतामध्ये लोकांना चांगलाच माहीत झाला आहे आणि पसंतीतही उतरला आहे. भारतातील काही टॉपच्या वेबसिरिजची लिस्ट नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये सुप्रसिद्ध वेब सिरिज 'सेक्रेड गेम्स' दुसऱ्या स्थानावर आहे. जाणून घ्या कोणत्या वेब सिरिजने पहिल्या क्रमांकाच स्थान पटकावलं आहे.
IMDB या साइटने नुकतीच 2019 मधल्या भारतातल्या टॉप वेब सिरीजची एक लिस्ट तयार केली आहे. चाहत्यांनी दिलेल्या रेटींगप्रमाणे चित्रपट, सिरिज, शो, मालिका यांची लिस्ट ही साईट तयार करते. या यादीमध्ये 'सेक्रेड गेम्स' ही सिरिज दुसऱ्या स्थानावर आली आहे. तर, पहिल्या स्थानावर 'कोटा फॅक्टरी' ही वेब सिरिज आहे. यामधलं जितू भैया हे पात्र चांगलचं फेमस झालं.
'कोटा फॅक्टरी' सिरिजविषयी
TVF ने तयार केलेली सिरिज युट्युबवर प्रसिद्ध झाली. काही नवीन कलाकारांची यामध्ये एन्ट्री होती. तरीही या सिरिजला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. राजस्थानच्या कोटामध्ये इंजिनिअरींगच्या प्रवेश परिक्षेची तयारी करणाऱ्या मुलांवर आधारीत ही सिरिज आहे. कोटामधील ही मुलं, तिथलं राहणीमान, एकुणच स्पर्धेचं वातावरण, कोचिंग क्लासेस आणि कोटाची खासियत यामध्ये दाखविली आहे. विशेष म्हणजे ही सिरिज संपूर्णपणे ब्लॅक अॅण्ड व्हाइट आहे.
'सेक्रेड गेम्स' लोकप्रिय ठरली पण...
नेटफ्लिक्सची वेब सिरिज 'सेक्रेड गेम्स' चांगलीच प्रसिद्ध झाली. या सिरिजचे दोन सिझन आले. पहिल्या सिझननंतर प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पहिल्या सिझनने प्रेक्षकांची मने जिंकली आणि ती सुपरहिट सिरिज ठरली.पण त्याचा दुसरा सिझन प्रेक्षकांना फारसा भोवला नाही. दुसऱ्या सिझनविषयी प्रेक्षकांनी नकारात्मक प्रतिसाद दिला. असं असलं तरी मात्र दुसऱ्या सिझनचे व्ह्युज जास्त होतेच.
सॅक्रेड गेम्स 2 दुसऱ्या स्थानावर असून मनोज वाजपेयी यांचा ‘दी फॅमिली मॅन’ हा तिसऱ्या स्थानावर आहे, त्यानंतर ‘दिल्ली क्राइम’, ‘ह्युमोरसली यॉरस्’, ‘टीव्हीएफ ट्रिपलींग’,’मेड इन हेवन’, ‘फ्लेम्स’, ‘इमसाइड एज’ आणि ‘बार्ड ऑफ ब्लड’ या सर्व वेब सिरीज IMDbच्या टॉप 10 वेब सिरीज 2019 मध्ये आल्या आहेत.