सध्या मालिका हेच लक्ष्य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

एखाद्या मालिकेत प्रमुख भूमिकेत एक अभिनेता आणि एक अभिनेत्री काम करत असले, की लगेच त्यांच्या जोड्या जुळवल्या जातात. कित्येक वेळा पुढे जाऊन या जोड्या बनतातही किंवा याचा कधीकधी या सेलिब्रेटींना त्रासही होतो.

स्टार प्लसवरील "तू सूरज मै सांझ पियाजी' या मालिकेतील अभिनेत्री रिहा शर्मा "एम. एस. धोनी' या चित्रपटानंतर पहिल्यांदाच मालिकेत काम करतेय. मालिकेत तिच्या भावाची भूमिका बजावणारा मयांक अरोराबरोबर ती डेटिंग करत असल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वीच पसरल्या होत्या. पण करियरच्या सुरुवातीलाच रिहाला कोणत्याही रिलेशनशिपमध्ये जाण्याची इच्छा नाही. ती "तू सूरज मै सांझ पियाजी' या मालिकेत कनक राठीची भूमिका करत आहे. मयांक तिचा ऑनस्क्रिन भाऊ वेद राठीची भूमिका बजावत आहे. ती त्याच्याबद्दल विचारल्यावर म्हणाली, "मयांक माझ्यासाठी मार्गदर्शक आहे. माझ्या करियरच्या या टप्प्यावर मला रिलेशनशिप नको आहे. माझे लक्ष मी माझ्या कामावर आणि सध्या या मालिकेवर केंद्रित केले आहे.' त्यामुळे आता तरी रिहाबद्दल अफवा पसरणार नाहीत, अशी आपण आशा करूया...  

Web Title: now only tv serial : Riha sharma