एन आर आय अंकीत 

संकलन : भक्ती परब  
शनिवार, 11 मार्च 2017

ऍण्ड टिव्हीवर लवकरच "अग्नीफेरा' नावाची नवी मालिका येतेय. या मालिकेत युक्ती कपूर आणि अंकीत गेरा मुख्य भूमिकेत आहेत. पाच-सहा मालिकांचा अनुभव गाठीशी असलेला अंकीत या मालिकेत एनआरआयच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये त्याचं नाव अनुराग आहे. या मालिकेच्या कथेला उत्तर प्रदेशची पार्श्‍वभूमी आहे. मालिकेतील काही कलाकार आपल्याला भोजपुरी बोलतानाही दिसतील. लहानपणापासून घरात बंदुकांशी खेळलेल्या रागिणीची ही गोष्ट आहे. जिला कायद्याचं भय नाही. थोडक्‍यात कायदे तोडणारी नायिका आणि कायद्याने वागणारा नायक असं मालिकेत मुख्य पात्रांचं वागणं बघायला मिळणार आहे.

ऍण्ड टिव्हीवर लवकरच "अग्नीफेरा' नावाची नवी मालिका येतेय. या मालिकेत युक्ती कपूर आणि अंकीत गेरा मुख्य भूमिकेत आहेत. पाच-सहा मालिकांचा अनुभव गाठीशी असलेला अंकीत या मालिकेत एनआरआयच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये त्याचं नाव अनुराग आहे. या मालिकेच्या कथेला उत्तर प्रदेशची पार्श्‍वभूमी आहे. मालिकेतील काही कलाकार आपल्याला भोजपुरी बोलतानाही दिसतील. लहानपणापासून घरात बंदुकांशी खेळलेल्या रागिणीची ही गोष्ट आहे. जिला कायद्याचं भय नाही. थोडक्‍यात कायदे तोडणारी नायिका आणि कायद्याने वागणारा नायक असं मालिकेत मुख्य पात्रांचं वागणं बघायला मिळणार आहे. या मालिकेत रागिणी या नायिकेबरोबरच तिची बहीण सृष्टी हिचीसुद्धा तिच्या समांतर जाणारी गोष्ट असणार आहे. म्हणजे दोन नायिका आणि एक नायक असाही फॉर्म्युला या मालिकेत दिसेल. याविषयी अंकीत म्हणाला, की ही खूपच वेगळ्या वाटेवरची कथा आहे. याआधी अशी कथा छोट्या पडद्यावर कुणीच पाहिली नसेल. अनुरागची भूमिका करणारा अंकीत लंडनमध्ये एमबीए केलेल्या एनआरआयची भूमिका मिळाल्याने भलताच उत्सुक आहे. आपली या मालिकेत खूपच स्टायलिश एन्ट्री दाखवण्यात आलीय, तेव्हा 20 मार्चपासून नक्की ही मालिका बघा. असं अंकीत आत्मविश्‍वासाने सांगतो. 
 

Web Title: NRI Ankit