'त्या' न्यूड सीनसाठी दिग्दर्शकाने मागितली माफी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नवी दिल्ली - नेटफ्लिक्सवरच्या अनेक सिरिज सध्या लोकप्रिय आहेत. नवाजउद्दीन सिद्दिकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुब्रा सईत यांच्या भूमिका असलेली 'सेक्रेड गेम्स' या सिरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिरिजमधील एक न्युड सीन व्हायरल झाला आहे. राधिका आपटेचा हा सीन असल्याची सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे. परंतु, ती साधिका आपटे नसुन, कुब्रा सईतने हा सीन दिला आहे. हा सीन सात वेळा चित्रित करावा लागला होता. त्याबद्दलचा तिचा अनुभव तिने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना शेअर केला आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या सिरिजचे दिग्दर्शक आहेत.

नवी दिल्ली - नेटफ्लिक्सवरच्या अनेक सिरिज सध्या लोकप्रिय आहेत. नवाजउद्दीन सिद्दिकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुब्रा सईत यांच्या भूमिका असलेली 'सेक्रेड गेम्स' या सिरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिरिजमधील एक न्युड सीन व्हायरल झाला आहे. राधिका आपटेचा हा सीन असल्याची सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे. परंतु, ती साधिका आपटे नसुन, कुब्रा सईतने हा सीन दिला आहे. हा सीन सात वेळा चित्रित करावा लागला होता. त्याबद्दलचा तिचा अनुभव तिने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना शेअर केला आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या सिरिजचे दिग्दर्शक आहेत. या सीनसाठी झालेल्या मानसिक त्रासाबद्दल त्यांनी आपली माफी मागितल्याचेही कुब्रा सईतने म्हटले आहे.

''हा सीन शुट करण्याअधी आम्ही छान हसत होतो. त्यानंतर अनुरागनी मला व्हॅनिटीमध्ये यायला सांगितले. सीन वाचताना जेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले त्याक्षणी त्याने मला सांगितले आता तू कोणाशीही न बोलता तडक सेटवर ये'', मी तसेच केले आणि हा सीन चित्रित झाला. परंतु, याचे सात 'टेक' करावे लागले. प्रत्येकवेळी अनुराग मला सॉरी म्हणत होता. कारण प्रत्येक टेक संपल्यावरही मला रडू आवरत नव्हते. शेवटी त्याला हवा तसा शॉट मिळाल्यानंतर त्याने माझे कौतुक केले आणि सगळ्या टिमने देखील टाळ्या वाजवून मला प्रोत्साहन दिले. परंतु, मला तेव्हाही रडू आवरत नव्हते.
कुब्रा सईत

आपण जेव्हा उत्तम दिग्दर्शकाबरोबर काम करतो तेव्हा ते काम सुंदरच होत असल्याचेही सईतने म्हटले आहे. या सिरिजमध्ये ती एका तृतीयपंथी कॅब्रे डान्सरची भूमिका साकारत आहे.  

कुब्रा सईतने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती अनेक जाहिरांतीमध्येही दिसली आहे. प्रो कबड्डी सारख्या कार्यक्रमाचे तीने सूत्रसंचालन देखील केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the 'Nude Scene', the director apologized for the demand