"नुसरत'ने अशी साजरी केली करवा चौथ 

"नुसरत'ने अशी साजरी केली करवा चौथ 

कोलकता : अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहा सोशल मीडियावरील आपल्या फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिचा सुंदर साडीतील फोटो पुन्हा सोशल मीडियावर आलाय. त्याचं कारण म्हणजे "करवा चौथ'चे व्रत होय. नुकतेच लग्न झालेल्या नुसरतने आपली पहिली करवा चौथ स्पेशल साजरी केली आहे. तिचा पती निखिल जैनसोबतचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. 

यावर्षी जून महिन्यात नुसरतचा विवाह प्रसिद्ध उद्योगपती निखिल जैन सोबत झाला होता. देशभरात तसेच प्रामुख्याने उत्तर भारतात करवा चौथचा सण उत्साहात साजरा केला जातो. नुसरत जहानेदेखील आपला पहिला करवा चौथ पूर्ण विधीसह पूर्ण केला. करवा चौथचे व्रत ठेवल्याने आपल्या पतीचे आयुष्य उदंड राहते, अशी श्रद्धा आहे. नेत्यांनी आणि सेलिब्रेटी त्यांच्या या फोटोला पसंती देत आहेत. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या दोघांतील प्रेम असेच कायम राहो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com