फ्लॉपच्या भीतीनं अक्षयनं घेतला मोठा निर्णय? यापुढे...| Oh My God 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oh My God 2

Oh My God 2 : फ्लॉपच्या भीतीनं अक्षयनं घेतला मोठा निर्णय? यापुढे...

Oh My God 2 Akshay Kumar bollywood actor next movie : बॉलीवूडच्या खिलाडी अक्षय कुमारला काय झाले आहे हे कळायला काही मार्ग नाही. त्याची यंदाच्या वर्षाची सुरुवात अपयशानं झाली. गेलं वर्ष देखील त्याला फार लाभदायी ठरलं नव्हतं. अक्षयला बॉक्स ऑफिसवर कमाईचे जे मोठे आकडे पाहण्याची सवय लागली आहे, तिच आता त्याला त्रासदायक ठरताना दिसत आहे.

गेल्या वर्षी अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज, राम सेतू आणि बच्चन पांडे याशिवाय ओटीटीवर कटपुतली नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र सगळ्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्याचा एकही चित्रपट जास्त कमाई करु शकला नाही. बॉक्स ऑफिसवर हे सगळे चित्रपट फ्लॉप झाल्याचे दिसून आले आहे. येत्या वर्षात अक्षयचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहेत.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

अक्षयनं आता त्याच्या चित्रपटांच्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, त्याचा ओह माय गॉड नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो प्रदर्शित न करण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार नाही. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. बॉलीवूडचा खिलाडी अशी ओळख असणाऱ्या अक्षयसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्याच्या सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे त्यानं हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

अक्षयचा आगामी चर्चेतील बहुप्रतिक्षित असा ओह माय गॉड २ नावाचा चित्रपट येत्या काळात ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. एका वेबसाईडनं दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आणि निर्माते हे डायरेक्ट टू डिजिटल या ऑप्शनच्या विचारात आहेत. या चित्रपटाचा दुसरा भाग वूट किंवा जियोवर प्रदर्शित करण्याचा विचार होत आहे.