Om Puri: 'इंटिमेट' सीन देताना ओम पूरीचा ताबा सुटला, त्यानंतर जे घडलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Om Puri News

Om Puri: 'इंटिमेट' सीन देताना ओम पूरीचा ताबा सुटला, त्यानंतर जे घडलं...

Om Puri Birth Anniversary: बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्यांविषयी नेहमीच बोलले जाते त्यामध्ये ओम पूरी यांच्या नावाचा समावेश करावा लागेल. ओम यांना त्यांच्या दिसण्यावरुन अनेकदा वेगवेगळ्या टोमण्यांचा सामना करावा लागला. तुझा चेहरा हा एखाद्या अभिनेत्याला शोभणारा नाही. त्यामुळे तू काही अभिनेता होऊ शकत नाही असेही त्याला सांगण्यात आले होते. मात्र त्यांचे अभिनेते मित्र नसिरुद्दीन शहा यांचा त्यांना मिळालेला आधार आणि ओम पुरी यांचा संघर्ष यामुळे त्यांनी स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती.

ओम पूरी हे त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयासाठी ओळखले गेले. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या अभिनयाचे तोंड भरुन कौतूक केले. भूमिका कोणतीही असो त्यामध्ये जीव ओतून काम करणे हा ओम यांचा स्वभाव होता. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी त्या भूमिकेचं सोनं केल्याचे दिसून आले. अपवाद होता त्यांनी दिलेल्या काही इंटिमेट सीनचा. त्यामध्ये ओम अनेकदा भरकटल्याचे दिसून आले.

ओम यांनी काही मुलाखतीमध्ये त्याविषयी खुलासा केला होता. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी घेतलेल्या मुलाखतीला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला होता. ओम यांनी यावेळी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेम प्रसंगांचा बिनधास्तपणे उल्लेख केला होता. आपण जे काही केलं त्याविषयी आपल्या मनात जराही किल्मिष नाही. कोणताही खेद नाही माझं आयुष्य हे ओपन बुक आहे. असे ओम यांनी सांगितले होते.

हेही वाचा: Kantara Twitter Review: केजीएफचा बाप 'कांतारा', हादरवून सोडणारा, गुंगवून टाकणारा

1997 मध्ये ओम पुरी आणि रेखा यांचा आस्था नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्यांनी रेखासोबत बोल्ड सीन दिला होता. त्यामध्ये त्यांनी रेखाच्या पतीची भूमिका केली होती. त्या इंटिमेट सीनच्या वेळी जे घडलं त्यावरुन ओम यांच्याविषयी बॉलीवूडमध्ये नेहमीच गॉसिप होत राहिलं. त्या दोन्ही कलाकारांना त्या इंटिमेट सीनच्या वेळी भान राहिलं नव्हतं. असं सांगितलं जातं. त्याची बराच काळ चर्चाही होती. तो सीन संपल्यानंतर दिग्दर्शकाला त्यांना अनेकदा सुचना द्याव्या लागल्या होत्या.

हेही वाचा: Viral Video: प्रेम म्हणजे आगीशी खेळ? धगधगत्या ज्वाळात नवरा नवरीचा रोमान्स