Adipurush Trailer: जय श्री राम..! रामायणाची गाथा झाली भव्यदिव्य, आदिपुरुषच्या ट्रेलरने जिंकलं मन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adipurush, adipurush trailer, adipurush motion poster, kriti sanon, prabhas, om raut

Adipurush Trailer: जय श्री राम..! रामायणाची गाथा झाली भव्यदिव्य, आदिपुरुषच्या ट्रेलरने जिंकलं मन

Adipurush Trailer News: गेल्या अनेक दिवसांपासून ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाच्या ट्रेलरची सर्वांना उत्सुकता होती. नाही नाही म्हणता हा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

आज आदिपुरुषच्या ट्रेलरचं ग्रँड लाँच झालं. ट्रेलर लाँचला प्रभास, क्रिती सेनन आणि सिनेमातले अन्य कलाकार उपस्थित होते. आदिपुरुषच्या ट्रेलरने सर्वांचं मन जिंकलं आहे.

(om raut's adipurush trailer out now prabhas, kriti sanon, saif ali khan in lead role)

आदिपुरुषच्या ट्रेलरमधून लहानपणापासून सर्वांनी ऐकलेली, वाचलेली रामायणाची गाथा भव्यदिव्य झाली आहे.

आदिपुरुषच्या टिझरमुळे जो वाद निर्माण झाला होता, VFX आणि इतर गोष्टींमध्ये ज्या चुका झालेल्या त्या चुका आदिपुरुषच्या टीमने टाळल्या आहेत. टिझरपेक्षाही भव्यदिव्य असा आदिपुरुषचा ट्रेलर भेटीला आलाय.

आदिपुरुष सिनेमात श्रीरामांच्या भूमिकेत प्रभास, सीतामाईंच्या भूमिकेत क्रिती सेनन, पवनपुत्र हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा देवदत्त नागे असे अनेक कलाकार दमदार अवतारात दिसत आहेत. सिनेमात रामायणातील अनेक महत्वपूर्ण घटना पाहायला मिळत आहेत.

शबरीने दिलेली बोरं, हनुमान रामाची अंगठी घेऊन बंदिवासात असलेल्या सीतेला भेटायला जाणं, श्रीरामाचा युद्धाप्रसंगी असलेला आक्रमक अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. विशेष गोष्ट क्रूर रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान ट्रेलरमध्ये एकदम शेवटी दिसतोय.

ट्रेलर रिलीजसाठी मुंबईत खास कार्यक्रम झाला. सिनेमातील मुख्य कलाकार ट्रेलर लाँचला उपस्थित होते. भव्यदिव्य ट्रेलर रिलीज झाल्यावर आदिपुरुष चित्रपट आता 16 जून रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

रामायणाची गाथा 3D मध्ये मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी जगभरातले फॅन्स उत्सुक आहेत. ट्रेलर तर चांगला आहेच आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणार का, हे चित्र थोड्याच दिवसांमध्ये स्पष्ट होईल.