सिटी ऑफ ड्रीम्स; राजकारणातील नात्यांचा जीवघेणा संघर्ष

प्रसिद्धी व सत्ता यांची नशा एकदा चढली, की माणूस रक्ताची नातीही विसरतो
Entertainment
Entertainment sakal

पैसा, प्रसिद्धी आणि सत्ता (Money,fame,Popularity) यांची नशा एकदा चढली, की माणूस रक्ताची नातीही विसरायला लागतो. सत्तेची भूक माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते याचं चित्रण ‘डिस्ने हॉटस्टार’ वरील ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’ वेबसीरिजमध्ये (Webseries) पाहायला मिळतं. दिग्दर्शक नागेश कुकनूर (Nagesh) यांच्या सीरिजचा पहिला सिझन अतिशय लोकप्रिय (Popular) ठरला होता. राजकीय (Political) पटलावर समोरासमोर उभे ठाकलेल्या बाप-लेकीमधील (Doughter and Dad) जीवघेणा संघर्ष कुकनूर यांनी दुसऱ्या भागात (Second episod) अप्रतिम हाताळलाय ; मात्र एकाच वेळी अनेक पात्रांच्या कथांना प्राधान्य देण्याच्या प्रयत्नात सीरिज (Series) काही ठिकाणी पूर्णपणे भरकटलीय.

पहिल्या सिझनमध्ये, साहेबांच्या दोन मुलांमध्ये राजकीय वारस कोण, यावरून वाद सुरू होतात. आपला भाऊ आशू माघार घेत नाही हे लक्षात आल्यावर पूर्णिमा त्याची हत्या घडवून आणते. त्याची माहिती मिळताच साहेब आणि पूर्णिमा यांच्यातील बाप-मुलीचं नातं संपून शत्रुत्व सुरू होतं. पूर्णिमा आपल्या राजकीय डावपेचांच्या साह्याने मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवते.

Entertainment
स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी रिलिज झालेले दोन चित्रपट माहितीये?

सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये निवडणुका तोंडावर आलेल्या पाहायला मिळतात. पूर्णिमाच्या निवडणूक जिंकण्याच्या मार्गातला सर्वांत मोठा अडसर असतो तो म्हणजे साहेब. आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घ्यायला तयार असलेले साहेब आणि त्यांच्या ताकदीची पूर्ण कल्पना असलेली पूर्णिमा यांच्यात डावपेचांना सुरुवात होते. त्यातच साहेबांच्या हाती दोन असे हुकमी पत्ते असतात ज्यांच्या जोरावर ते पूर्णिमाला वैयक्तिक आणि राजकीय जीवनात जेरीस आणतात. साहेबांच्या हाती लागलेले हुकमी पत्ते नेमके कोणते? साहेबांच्या खेळीने पूर्णिमा माघार घेते की सत्तेचा जीवघेणा संघर्ष बाप-लेकीला उद्ध्वस्त करतो, हे सीरिजमध्ये दाखवण्यात आलंय.

वेबसीरिजचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे कथेतील पात्रांच्या अनेक पैलूंची केलेली हाताळणी. राजकीय कथानकांमध्ये राजकारण, त्यातील डावपेच, संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपात राजकारणापलीकडली माणसं कुठे तरी दुर्लक्षित राहतात; मात्र ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’मध्ये राजकारणातला संघर्ष मांडताना माणसातल्या माणुसकीचं द्वंद्वही अनेक बारकाव्यांसह रेखाटण्यात आलंय. पूर्णिमा, तिचा पती, मुलगा, साहेब, महेश आणि लिपाक्षी यांच्यामध्ये सुरू असलेला संघर्ष तितकाच महत्त्वाचा आहे. वसीम खान आणि त्याच्या मुलीचं नातंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमधील राजकीय संघर्षाच्या पलीकडे सीरिज तुम्हाला घेऊन जाते.

Entertainment
विराटला अनुष्काचा आवडलेला चित्रपट माहितीये?

सीरिजमध्ये गडबड सुरू होते जेव्हा मेहका इन्फ्राचा मालक, त्याच्या होणाऱ्या बायकोने सुरू केलेलं ॲप, तिच्या वडिलांचा दबदबा, पूर्णिमा आणि लिपाक्षीचं नातं, गुन्हेगारी विश्वाचा कारभार इत्यादींसारख्या गोष्टींवर काही एपिसोड खर्च करण्यात आले आहेत तेव्हा... महेश आरवले ही व्यक्तिरेखा या संघर्षात काही तरी कमाल करील अशा पद्धतीने त्याची एन्ट्री दाखवण्यात आलीय, पण नंतर त्याला बाजूला करण्यात आलंय. तेच सुशांत सिंगने साकारलेल्या अण्णाबद्दल झालंय.थंड डोक्याने आणि हसऱ्या चेहऱ्याने प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणाऱ्या साहेबांची भूमिका अतुल कुलकर्णी यांनी अप्रतिम साकारलीय. त्याला प्रिया बापट आणि सचिन पिळगावकर यांनी उत्तम साथ दिलीय. संदीप कुलकर्णी आणि एजाज खान यांच्या भूमिकाही चांगल्या झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com