लेखन दिग्दर्शनाचे सूर जुळले... 

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

आजपर्यंत ज्याचा फक्त आपण आवाज ऐकला आहे किंवा ज्याने दिलेले संगीत ऐकले आहे. तो राष्ट्रीय पुरस्कार, ऍकॅडमी ऍवॉर्ड विजेता गायक ए. आर. रेहमान पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करतोय.

आजपर्यंत ज्याचा फक्त आपण आवाज ऐकला आहे किंवा ज्याने दिलेले संगीत ऐकले आहे. तो राष्ट्रीय पुरस्कार, ऍकॅडमी ऍवॉर्ड विजेता गायक ए. आर. रेहमान पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करतोय.

त्याने दिग्दर्शित केलेला पहिला "ले मस्क' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ए. आर. रेहमानने या चित्रपटाचे चित्रीकरण रोममध्ये केले आहे. ही कथा आहे एका ज्युलिएट नावाच्या अनाथ मुलीची. एक रहस्यमयी सुगंध नेहमीच तिच्याबरोबर राहत असतो. एक दिवस तिच्या नावाने एक निनावी संदेश येतो आणि तिच्या जीवनात नाट्यमय वळण येते. या मुलीची भूमिका फ्रान्सची अभिनेत्री नोरा अर्नेजेदेर यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनच नाही तर या चित्रपटाची कथाही रेहमान यांनीच लिहीली आहे. नोएडामध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन केले जाणार आहे.  

Web Title: One can do anything, just delve deeper into it: AR Rahman on turning director