Onkar Bhojane: कॉमेडी किंग ओंकारचं नशीब उजळलं! 'हिरो' म्हणून झळकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onkar Bhojane News

Onkar Bhojane: कॉमेडी किंग ओंकारचं नशीब उजळलं! 'हिरो' म्हणून झळकणार

Onkar Bhojane News: टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या अभियनयानं लाखो मराठी चाहत्यांची पसंती मिळवणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये ओंकार भोजनेचं नाव घेतलं जातंय. तो आता मराठीतला कॉमेडी किंग म्हणून नावारुपाला आला आहे. त्याचा परफॉर्मन्स, विनोदाचं टायमिंग हे सारं कमालीचं प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ओंकारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तो आता एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मिती असलेल्या चित्रपटात तो हिरो म्हणून झळकणार आहे. या निमित्ताने एका वेगळ्या अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर येणार आहे.

छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या  'कॉमेडी ची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', ' एकदम कडक' आणि  महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि 'अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..' या ओंकारच्या संवादाने तर समस्त प्रेक्षकांना वेड लावले आहे. आता हाच कॉमेडी किंग लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण पार पडले आहे.  या आगामी चित्रपटात ओंकार सोबत मराठीतील दिग्गज कलाकार असल्याचेही समोर आले आहे. 'आटपाडी नाईट्स' फेम लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आहे.  चित्रपटाचे पहिले शेड्यूल भोर परिसरात मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले. आरती चव्हाण यांची निर्मिती असलेल्या या आगामी बिग बजेट मराठी चित्रपटाचे नाव तसेच ओंकार भोजनेसोबत कोणती नायिका झळकणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: 'Bye Bye आंटी!' मलायकाच्या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ओंकार भोजने म्हणाला की, आजवर टीव्ही किंवा चित्रपटात साकारलेल्या भूमिकांपेक्षा या व्यक्तिरेखेची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. यासोबतच हिरो म्हणून समोर येतोय याचा आनंद आहे.  या चित्रपटाचा नायक ज्या वयाचा आणि ज्या भावनिक विश्वात आहे त्याच अवस्थेत मी आहे, हे मला चित्रपटाचे नॅरेशन सुरू झाले तेव्हा जाणवले. हे पात्र दिग्दर्शकाला जसे हवे होते ते साकारण्यासाठी मला संपूर्ण टीमची मदत झाली, एकांकिका करताना जशी एनर्जी असायची तशीच एनर्जी मला या सेटवर जाणवली यामुळे काम करताना खूप गंमत आली.

हेही वाचा: Shama Sikander: 'हवा में उडता जाये तेरा...'

Web Title: Onkar Bhojane Comedy King Now Entry Hero Marathi Movie As Leading Role

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..