कभी खुशी कभी दुरी रक्षाबंधन; कलाकारांमध्येही रंगला ऑनलाईन रक्षाबंधनाचा सोहळा

संतोष भिंगार्डे
Monday, 3 August 2020

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

 

मुंबई ः सन 2020 हे वर्ष अनेक कारणांनी सर्वांच्याच लक्षात राहणार हे नक्की. कोरोनामुळे उद््भवलेल्या परिस्थितीमुळे सध्या लाॅकडाऊन आहे. त्यामुळे बहीण आणि भावाची प्रत्यक्ष भेट होणे कठीण आहे. त्यामुळे एकमेकांनी सोशल मीडियावरून एकमेकांना शुभेच्छा दिलाय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांनीही साजरा केला केला रक्षाबंधन...

अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयातून घरी परतले आहेत. अभिषेक अजूनही रुग्णालयात आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमिताभ यांनी श्वेता, अभिषेक, आराध्या व अगस्त्या नंदा यांचा एक फोटो शेअर करीत लिहिले आहे की, रक्षाबंधन हा बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा सण. भावाने बहिणीचे संरक्षण करण्याचा सण. प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला तिच्या संरक्षणाचे वचन दिले. भावा-बहिणीच्या या सणाच्या निमित्ताने संरक्षणाच्या जबाबदारीची आठवण प्रत्येकाने ठेवावी. संकटकाळी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला मदत करेल .

सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी अमृता फडणवीसांचे मोठे व्यक्तव्य; वाचा काय केले ट्विट

अभिनेत्री सोनम कपूरने आपली निर्माती बहिण रिया आणि भाऊ हर्षवर्धनसाठी एक खास पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, रिया तर  मैत्रीणच आहे. ते दोघे कितीही दूर असले तरीही आम्ही एकमेकांच्या हृदयात आहोत.

Sonam K Ahuja (@sonamakapoor) | Twitter

माजी विश्व ॉसुंदरी मानुषी छील्ल ने आपल्या भाऊ व बहिणी सोबतचा फोटो शेअर करीत लिहिले की ,आमच्या आई-वडिलांच्या शिकवणीनुसार आम्हाला जीवनात कधीही लिंगभेद न करण्याची शिकवण मिळाली आहे. ती आम्ही पाळीत आहोत . सर्व बहिणींना व विशेष करून भावांना शुभेच्छा. आपल्या कर्तव्याची भावांनी जाणीव ठेवा , असे मानुषीने म्हटले आहे .

Menstrual Hygiene: Miss World 2017 Manushi Chillar Kick Starts A ...

सारा आणि इब्राहीम या सैफ अली खान यांच्या मुलांनी पारंपारिक पद्धतीने रक्षाबंधन साजरा केलाय.आपल्या रीतीरिवाजानुसार सर्वांनी सणाचे पावित्र्य राखत सण साजरे करावे. आम्ही कधीही एकमेकांपासून मनाने दूर राहात नाही. आम्ही केवळ भाऊ-बहीण नाही तर चांगले मित्र आहोत , असे साराने म्हटले आहे

Sara Ali Khan wishes brother Ibrahim on birthday with throwback ...

टीव्ही मालिकांतील कलाकार रक्षाबंधन

झी टीव्हीवरील  “ कुमकुम ” मालिकेतील प्राचीची भूमिका साकारणाऱ्या मुग्धा चाफेकरने सांगितले की,  रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यास मी कधीच चुकत नाही. तो माझ्यासाठी खास सण आहे. आदित्य हा माझा धाकटा भाऊ आहे. लहान असताना माझे पालक माझ्यासाठी भेट घेऊन येत, त्या तो मला देत असे. पण जेव्हा त्याला नोकरी लागली, तेव्हा त्याने त्याचा पहिला पगार मला भेट म्हणून दिला. ते पाहून मी अवाक झाले आणि मला त्याचा खूप अभिमान वाटला. तो मला नेहमीच अभिमानास्पद वाटतो. तो आणि माझा चुलत भाऊ ओंकार हे त्यांच्या प्रत्येक कर्तबगारीनंतर मला अभिमानास्पद वाटतात.

Mugdha Chaphekar - Home | Facebook

“ कुरबान हुआ ”मधील नीलची भूमिका साकारणारा अभिनेता करण जोटवाणी म्हणतो की , मला सख्खी बहीण नसली तरी चुलत बहीणच माझी सख्खी बहीण आहे. यावर्षी माझी रक्षाबंधन खऱ्या अर्थाने खूप भावनाशील आहे कारण माझी बहीण  तिच्या नवीन कारकिर्दीसाठी तीन वर्षांसाठी चेन्नईला गेली आहे. आज ती राखी बांधायला नाही.

Depression never goes away: Karan Jotwani | People News | Zee News

“ कुंडली भाग्य ”मध्ये ऋषभची भूमिका साकारणाऱ्या मनीत जौरा म्हणाला की, यंदा मी माझ्या बहिणीकडे दिल्लीला जाऊ शकत नाही कारण परिस्थिती वेगळी आहे. मी आणि माझी बहिण वर्च्युअल रक्षाबंधन करतोय. कुरिअरने मी तिला एक गिफ्ट पाठवले व नक्कीच तिला ती भेटवस्तू बघितल्यावर आश्चर्याचा धक्का बसेल.

Manit Joura: It's a low-key birthday this year, but I miss being ...

“ इश्क सुभान अल्लाह ”मध्ये झारची भूमिका साकारणाऱ्या आयेशा सिंहने आपल्या भावना व्यक्तकरताना सांगितले की, आम्ही रक्षाबंधन भोपाळमध्ये साजरा करणार होतो. मात्र आता मी वर्च्युअल रक्षा बंधन साजरे करू.

Ayesha Singh stills at Yedu Chepala Katha Press Meet | Actresses ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online Rakshabandhan ceremony among artists too