Mumbai : सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करण्यात येणार; सुधीर मुनगंटीवार

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
screening of Marathi movies in cinemas Sudhir Mungantiwar
screening of Marathi movies in cinemas Sudhir Mungantiwarsakal

मुंबई : महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही सिनेमांना सिनेमागृहे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात.

screening of Marathi movies in cinemas Sudhir Mungantiwar
Mumbai Crime: चांगला सल्ला देणे पडलं महागात ! मित्राने चिडून केला चाकू हल्ला

त्यामुळेच येणाऱ्या काळाम सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मराठी सिनेमांना सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

screening of Marathi movies in cinemas Sudhir Mungantiwar
Butterfly Movie: त्या एका ठिणगीनं आयुष्याला लखलख लायटिंग होतं.. पण 'ही' ठिणगी आहे कोण? बघाच..

या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, मराठी सिनेमांचे निर्माते, दिग्दर्शक तसेच सिनेमागृहांचे मालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, निश्चित कार्यप्रणाली करण्यामागे सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असून यासाठी गृह विभागासह विविध विभागांचे समन्वय आवश्यक असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली करण्यात येईल.

screening of Marathi movies in cinemas Sudhir Mungantiwar
Marathi Movie Issue: मराठी सिनेमा-थिएटर वादावर सरकारचा महत्वाचा निर्णय; पालन न झाल्यास १० लाखांचा दंड

आज झालेल्या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी येत्या 15 दिवसांमध्ये मराठी सिनेमा निर्मात्यांनी आपली निवेदने दयावीत जेणेकरुन याविषयाबाबत विस्तृत बैठक 15 जूननंतर घेण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले. आज अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना याबाबतही काही नियमावली तयार करता येईल का याबाबतचा अभ्यासही करण्यात यावा अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com