Oscar 2023: कधी कुठे आणि कसा पहायचा ऑस्कर? इथं आहे उत्तर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar 2023:

Oscar 2023: कधी कुठे आणि कसा पहायचा ऑस्कर? इथं आहे उत्तर..

95व्या ऑस्कर पुरस्काराची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. यंदाच्या या ऑस्कर सोहळ्यावर सर्वच भारतियांच्या नजरा खिळल्या आहेत. त्याचे कारण देखील विशेष आहे. साउथ चित्रपटातील दिग्गज चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीमध्ये अकादमी पुरस्कार 2023 साठी नामांकन मिळाले आहे.

म्हणूनच निर्माते आणि स्टार कास्ट सोबतच, प्रत्येक भारतीयाला आपण ऑस्कर मिळावा अशी आशा आहे. सर्व भारतीय यासाठी खुप उत्सूक आहेत.

जगभरातील 95व्या ऑस्कर पुरस्कार 2023 बद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या वेळी कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी ९५ वा अकादमी पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

तसेच समारंभातील पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल. ऑस्कर 2023 च्या क्षणोक्षणी अपडेटसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासोबतच हॉलिवूडच्या 95व्या अकादमी पुरस्कारांचीही तयारी सुरू आहे.

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Hulu Live TV, YouTube TV, AT&T TV आणि Fubo TV यासह ऑस्करचे थेट कव्हरेज प्रवाहित करण्यासाठी यूएस दर्शकांकडे अनेक पर्याय आहेत. या प्लॅटफॉर्मवर इव्हेंटच्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातील. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हा कार्यक्रम चर्चेत आहे. अकादमीचे ट्विटर हँडल देखील अवॉर्ड शोच्या वेळोवेळीचे अपडेट दाखवेल जातील.

भारतात ऑस्कर अवॉर्ड्स 2023 चे थेट प्रक्षेपण पाहायचे असेल, तर तुम्ही प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर हा विशेष चित्रपट पुरस्कार सोहळा पाहू शकणार आहेत. याशिवाय तुम्ही एबीसी नेटवर्क केबल, सीलिंग टीव्ही, हुलू प्लस लाइव्ह टीव्ही, यूट्यूब टीव्ही आणि फुबो टीव्हीवर लाइव्ह पाहू शकता.

टॅग्स :Oscar Awardoscar