एका ऑस्करसाठी जीवाचा एवढा आटापिटा का? असं नेमकं कोणतं घबाड लागतं हाती..वाचा सविस्तरOscar 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar 2023

Oscar 2023: एका ऑस्करसाठी जीवाचा एवढा आटापिटा का? असं नेमकं कोणतं घबाड लागतं हाती..वाचा सविस्तर

Oscar 2023: नाटू नाटू गाण्यासाठी ऑस्कर अॅवॉर्ड जिंकल्यानंतर गाण्याचे संगीतकार एम एम कीरावानी यांचे स्पीच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फक्त किरावानीच नाही तर प्रत्येक वर्षीच ऑस्कर विजेत्यांचे स्पीच चर्चेत पहायला मिळते.

हातात चमचमणारी गोल्डन ट्रॉफी पकडून तिला न्याहाळत स्पीच देणाऱ्या ऑस्कर विनर्ससाठी तो खूपच अभिमानाचा क्षण असतो आणि ते सर्वच हा आयुष्यातला खूप अविस्मरणीय क्षण आहे असं देखील म्हणतात.

जगभरातील फिल्म इंडस्ट्रीज प्रत्येक वर्षी अनेक सिनेमे बनवतात. यातील कितीतरी सिनेमे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कारांचे मानकरी ठरतात. पण ऑस्कर जिंकण्याचा आनंद आणि सेलिब्रेशन काही औरच असतं.

RRR चं ऑस्कर जिकंणं सबंध भारतीयांसाठी सन्मानाचा क्षण होता. सोशल मीडियावर आरआरआर ची प्रशंसा करणाऱ्या ट्वीट्स आणि पोस्ट्सचा नुसता खच पडला आहे.(Oscar 2023 natu natu song and the elephant whisperers wiinner)

ऑस्कर जिंकल्यानंतरचा उत्साह पाहून हा प्रश्न उठणं साहजिक आहे की अखेर ऑस्कर जिंकल्यानंतर असं काय बदलतं? जर तुमच्या मनातही हा प्रश्न आला असेल तर चला इथे त्याचं उत्तर जाणून घेऊया.

जेव्हा एआर रहमान यांना ऑस्कर मिळाला होता तेव्हा ते म्हणाले होते,''ऑस्कर जिंकल्यानंतर त्यांच्याकडे एवढ्या संधी चालून आल्यात की त्यातनं कोणती स्विकारावी आणि कोणती नाही हे माझ्यासाठी कठीण झालंय. आधी मोजक्याच ऑफर यायच्या तेव्हा सोपं होतं काम निवडणं पण आता प्रत्येक दरवाजा माझ्यासाठी खुला आहे. मी एक पॉप आर्टिस्ट बनू शकतो..हॉलीवूड कम्पोजर बनू शकतो..एवढंच नाही तर फिल्म निर्माता देखील बनू शकतो...पण यातलं काय निवडू?''

हॉलीवूड अभिनेत्री ग्वेनेथ पेल्ट्रोनं देखील १९९८ साली ऑस्कर जिंकल्यावर म्हटलं होतंकी, ''यानंतर आपण एका वेगळ्याच दुनियेत जातो. जिथे सगळेच तुम्हाला ओळखतात. आणि याचा एक मोठा फायदा कलाकारांच्या मानधनात वाढ असाही होतो''.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

आता रहमान यांचा विचार केला तर ऑस्कर नंतर जगभरात त्यांना ओळखलं जाऊ लागलं. त्यांच्याकडे चॉइसेस होत्या. मार्वलच्या 'अवेंजर्स:एंडगेम' च्या वेळी मार्वल अॅंथम बनवणं, इंटरनॅशन बॅन्डसोबत काम करणं आणि जगभरात एकापेक्षा एक अव्वल वेन्यूवर कॉन्सर्ट करण्याची संधी मिळणं हे सगळं त्यांच्याबाबतीत ऑस्करनंतरच झालं.

राजामौली यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्यासोबत काम करायला आता मार्वल स्टुडिओज देखील उत्सुक आहे. लवकरच ते एकत्र सुपरहिरो प्रोजेक्ट करू शकतील.

तसंच, राजामौली यांनी महेशबाबू सोबत आधीच एक मोठा एडवेंचर सिनेमा अनाऊन्स केला आहे. या सिनेमात त्यांचा हिरो जगभरात फिरताना दिसणार आहे. सिनेमाचं बजेट मोठं असणार यात शंकाच नाही. ग्लोबल सिनेमा असल्यामुळे इंटरनॅशनल पब्लिकही सिनेमासाठी उत्सुक असणार यात शंकाच नाही.

ऑस्करमध्ये आरआरआर पोहोचला नाही तोवर आपण ज्यु,एनटीआर आणि रामचरणच्या इंटरनॅशनल प्रोजेक्ट करणार असल्याच्या बातम्या ऐकल्याच असतील. गेल्या काही दिवसांत हे दोन्ही अभिनेते अधनंमधनं हॉलीवूडच्या बड्या दिग्दर्शकांची भेट घेतानाही दिसले. तसंच हॉलीवूडच्या बड्या दिग्दर्शकासोबत काम करत असल्याची हिंट रामचरणनंही दिली होती.

हॉलीवूड सध्या एशियन मार्केट्स आणि खासकरून भारताला टार्गेट करून प्रोजेक्ट तयार करत आहे. अशात ऑस्कर जिंकलेल्या टीमला कास्ट करण्याचा विचार करणं हे हॉलीवूड फिल्ममेकर्ससाठी कठीण गोष्ट तर मुळीच नाही.

तर ऑस्कर जिंकल्यानंतर एवढं सगळं घडतं विजेत्यासोबत म्हणूनच असतो बरं सगळा आटापिटा..

टॅग्स :Oscar AwardOscars