नाटू नाटूला ऑस्कर जिंकल्यानंतर रहमान यांची मोठी प्रतिक्रिया, आता...| Oscar Awards 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar Awards 2023

Oscar Awards 2023 : नाटू नाटूला ऑस्कर जिंकल्यानंतर रहमान यांची मोठी प्रतिक्रिया, आता...

Oscar Awards 2023 Natu Natu Song RRR AR Rehman : प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआऱआऱ चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर देशभरामध्ये त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासगळ्यात १४ वर्षांपूर्वी भारताला ऑस्कर मिळवून देणारे प्रख्यात संगीतकार ए आर रहमान यांनी देखील नाटू नाटूची मुक्तकंठानं प्रशंसा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाटू नाटू ची चर्चा होती. या गाण्याला ऑस्कर मिळणार की नाही याची चाहत्यांना आणि तमाम भारतीयांना उत्सुकता होती. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर भारताला राजामौली यांनी ऑस्कर मिळवून दिला आहे. राजामौली यांच्या आरआऱआऱ चित्रपटानं बॉक्सऑफिवर मोठं यश मिळवलं होतं. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये जेव्हा आरआरआऱचे स्क्रिनिंग झाले तेव्हा अवतार चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी राजामौलींचे कौतूक केले होते.

Also Read - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

सोशल मीडियावर राजामौली आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर जोरदार कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे. यासगळ्यात ऑस्कर विजेते ए आर रहमान यांच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नाटू नाटू या गाण्याची ऑस्कर नॉमिनेशनसाठी निवड होणे ही महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला ऑस्कर मिळणे ही देशासाठी महत्वाची गोष्ट आहे. अशाप्रकारे देशाची सांस्कृतिक एकता टिकवून ठेवणे शक्य होणार आहे.

आरआरआरचे नॉमिनेशन झाल्यापासून ते अनेकांचा पसंतीक्रम होता. भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामध्ये एलिफंट व्हिस्पफर्स या माहितीपटाला देखील ऑस्करनं गौरविण्यात आले आहे. गुनीत मोंगा यांच्या या माहितीपटानं साऱ्या जगाला थक्क करुन सोडले आहे. एका आगळ्या विषयावरील त्या माहितीपटानं परिक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.