
Frank Langella: एवढा मोठा अभिनेता झाला 'आऊट ऑफ कंट्रोल' शो मधून काढलं
Hollywood News: हॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेता फ्रँक लँगेला याला नेटफ्लिक्सच्या (NetFlix News) एका शो मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला (oscar news) आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वय वर्षे 84 असणाऱ्या फ्रँककडून अशा प्रकारच्या कृतीची अपेक्षा नव्हती. असे आता त्याचे चाहते आणि नेटकरी म्हणून लागले आहे. फ्रँकच्या (Frank Langella) कृत्याविषयीची माहिती देणारी बातमी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे फ्रँक हा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन झालेला अभिनेता आहे. याप्रकरणी नेटफ्लिक्सनं त्याच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
द फॉल ऑफ द हाऊस ऑफ उशेर या मालिकेमध्ये फ्रँक भूमिका करत असून त्यानं या मालिकेतील एका महिला कलाकारासोबत गैरवर्तन केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्या महिलेनं आपल्या तक्रारीमध्ये फ्रँकनं आपल्यासोबत लज्जास्पद वर्तन केल्याचे निर्मात्यांना सांगितले. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी फ्रँकवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेत त्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यापूर्वी देखील फ्रँकवर अशाप्रकारचे आरोप झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र यावेळी त्याच्यावर झालेल्या कारवाईमुळे चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हॉलीवूड वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथनं केलेल्या कृत्यामुळे त्या सोहळ्याला गालबोट लागले होते. आता विलला देखील पुढील दहा वर्षांसाठी ऑस्करमध्ये सहभागी होता येणार नाही. असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: Viral News: काय सांगता कतरिनाची गुड न्युज?, फोटोनं नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष
फ्रँक नेटफ्लिक्सच्या ज्या मालिकेत काम करतो त्या मालिकेतील महिलेसोबत त्यानं गैरवर्तन केल्याचे प्रॉडक्शनच्या वतीनं सांगण्यात आले आहे. त्यावरच तो थांबला नाही तर त्यानं महिलेवर अश्लील शेरेबाजीही केली होती. 2008 मध्ये आलेल्या फ्रोस्ट या चित्रपटात निक्सॉन यांच्या भूमिकेसाठी फ्रँकला ऑस्करचं नामांकनही मिळालं होतं. 1965 पासून हॉलीवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या फ्रँकचा चाहतावर्ग मोठा आहे. 1979 मध्ये आलेल्या ड्राक्युल्या नावाच्या फिल्मध्ये देखील फ्रँकच्या भूमिकेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
हेही वाचा: Video Viral: असशील 'KGF2' चा मोठा स्टार बरं मग?, यशनं मागितली माफी
Web Title: Oscar Nominated Actor Frank Langella 84 Sexual Harassment Netflix Series Viral News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..