
The Elephant Whisperers: हाच आहे ऑस्कर विनिंग शॉर्टफिल्मचा खरा हिरो 'रघू', ज्याला पहायला फॉरेनर्सही करतायत गर्दी
The Elephant Whisperers: यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात शॉर्ट डॉक्युमेन्ट्रीचा पुरस्कार भारताच्या 'द एलिफेंट व्हिस्पर्सला' मिळाला आणि संपूर्ण जगात याची चर्चा सुरू झाली. सिनेमातील एक अनाथ हत्ती आणि एका गरीब दाम्पत्याची कहाणी सर्वांचे मन जिंकून गेली.
या डॉक्युमेन्ट्रीत ज्या हत्तीनं रघु नावाच्या व्यक्तीरेखेला साकारलं आहे त्याची चर्चा जगाच्या कानाकोपऱ्यात आता होत आहे. देश-विदेशातून लोक आता खास रघुला पहायला गर्दी करताना दिसत आहेत.
द एलिफंट व्हिस्पर्स नं ऑस्कर आपल्या नावावर केल्यानंतर थेप्पाकडू एलिफंट कॅंप मध्ये परदेशी लोक जास्त करुन गर्दी करताना दिसत आहेत. प्रत्येकाला रघु हत्तीला पहायचं आहे. (Oscar winner short documentary the elephant whisperers real hero raghu elephant tamilnadu)
लंडनमधील आलेल्या एका महिला पर्यटकानं सांगितलं की-''मी लंडनहून आलेय,आम्ही या ठिकाणी भेट दिली कारण ज्या बेबी एलिफंटनं ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे त्याला आम्हाला पहायचं आहे. मला हत्ती खूप आवडतात आणि आता मी ऑस्कर जिंकणाऱ्या हत्तीला भेटलेय याचा मला खूप आनंद होत आहे''.
तुम्हाला माहितीसाठी सांगतो की, 'द एलिफंट व्हिस्परर्स' चं शूटिंग तामिळनाडूच्या नीलगिरी पर्वतावरील मृदुमलाई टायगर रिझर्व्ह च्या थेप्पाकडू एलिफंट कॅंप मध्ये झालं आहे.
हा आशिया खंडातील सगळ्यात जुना एलिफंट कॅम्प आहे. जवळपास १५० वर्ष जुना कॅम्प आहे. कॅम्पमध्ये राहणाऱ्या रघुचं खास डाएट आहे. रघुच्या खाण्यापिण्याविषयी बोलायचं झालं तर तो भात,गूळ, नाचणी,नारळ,ऊस,कुळीथ असे हेल्दी पदार्थ खातो.
हेही वाचा: देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
या ऑस्कर विनिंग डॉक्युमेन्ट्रीला शूट करण्यासाठी सिनेमाच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोंसाल्विस इथे जवळपास ५ वर्ष राहिल्या. इथली प्रत्येक गोष्ट जवळून लक्षात घेतली आणि मग सिनेमा शूट केला.
ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' डॉक्युमेन्ट्रीत एक अनाथ हत्ती रघु आणि त्याची देखरेख करणाऱ्या दाम्पत्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. जे खूप कष्टाचं जीवन जगत असूनही एका हत्तीचं पालन-पोषण करतात.