Jessica Chastain: अवॉर्ड जिंकल्याच्या आनंदात भान विसरली अन् अभिनेत्री स्टेजवरच पडली! व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jessica Chastain video

Jessica Chastain: अवॉर्ड जिंकल्याच्या आनंदात भान विसरली अन् अभिनेत्री स्टेजवरच पडली! व्हिडिओ व्हायरल

लॉस एंजेलिसमध्ये नुकत्याच झालेल्या 29व्या स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री जेसिका चेस्टेनसोबत एक अपघात झाला. एसएजी पुरस्कारादरम्यान या अभिनेत्रीच्या नावाची घोषणा करण्यात आली. तिच्या नावची घोषणा होताच तिच्या आंनदाला सिमा राहिली नाही.

जेसिका ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजकडे वळाली. मात्र स्टेजवर चढत असताना तिचा ड्रेस अडकला आणि ती पडण्यापासून थोडक्यात बचावली. जेसिकाचा हा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अवॉर्ड शोमधील अभिनेत्रींचे कपडे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. चाहत्यांमध्ये त्याचे वेगळेच आकर्षनही असते. मात्र कधी कधी हे कपडे अडचणीचे देखील ठरु शकतात. 45 वर्षीय अभिनेत्री जेसिकाने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. जो खूपच सुंदर दिसत होता.

जॉर्ज अ‍ॅण्ड टॅमी मधील तिच्या अभिनयासाठी जेसिकाला सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रींचा पुरस्कार देण्यात आला. जेसिका ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर जात असताना अभिनेत्रीचा गाऊन तिच्या पायात अडकला आणि ती खाली पडली. या घटनेमुळे तिला थोडं विचित्र वाटलं अभिनेत्रीने यामागचे कारण तिचा ड्रेस सांगितलं.

अभिनेत्री म्हणाली, 'असं होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. होय, मी पायऱ्यांवरु पडले, हे चांगले आहे की काही लोकांना माझ्यायोबत काय झाले हे देखील माहित नव्हते. मी माझ्या ड्रेसमध्ये अडकले होतो, पण माझ्यासोबत खूप छान माणसं होती, ज्यांनी मला मदत केली. हा एक प्लस पॉइंट होता.

टॅग्स :viralhollywoodVideo