March OTT Release: मार्चमध्ये ओटीटीवर मनोरंजनाचा तडका! 'या' वेबसिरिज नक्की पहा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

March OTT Release

March OTT Release: मार्चमध्ये ओटीटीवर मनोरंजनाचा तडका! 'या' वेबसिरिज नक्की पहा!

मार्च महिना सुरू होणार आहे. मार्च महिन्यात घरबसल्या ओटीटीवर तुमचे भरपूर मनोरंजन होणार आहे. नसीरुद्दीन शाह स्टारर 'ताज-डिव्हाइड बाय ब्लड', अलोनसह यांसह अनेक चित्रपट आणि वेब सीरिज OTT च्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. मार्च महिन्यात OTT वर प्रसारित हे चित्रपट होणार आहेत.

ताज: डिवाइडेड बाय ब्लड:

'ताज: डिव्हाइड बाय ब्लड' हा पीरियड ड्रामा आहे, जो ३ मार्च रोजी Zee5 वर प्रदर्शित होत आहे. याचे 10 भाग आहेत, विशेष म्हणजे आता दिग्गज कलाकारही यात आहेत. या वेब सिरीजद्वारे धर्मेंद्र ओटीटीवर डेब्यू करत आहे. त्यांच्याशिवाय नसीरुद्दीन शाहही अकबरच्या भूमिकेत दिसणार आहे

'अलोन'

3 मार्च रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही वेबसिरिज प्रसारित होईल . त्याची कथा कालिदासांच्या जीवनावर आधारित आहे. कालिदास, हा कोरोना महामारीच्या काळात कोईम्बतूरहून केरळला जाताना अडकला होता.

ख्रिस रॉक:

हा लाईव्ह वर्ल्डवाइड जो नेटफ्लिक्सद्वारे प्रसारित केला जाईल . नेटफ्लिक्स शोचे थेट प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यामध्ये ख्रिस रॉकची रियल टाइम स्टँड अप कॉमेडी पाहायला मिळणार आहे. 5 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.

गुलमोहर:

शर्मिला टागोरनेही ओटीटीवर पदार्पण केले आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवरील 'गुलमोहर' या आगामी चित्रपटात शर्मिला टागोर दिसणार आहे. हा चित्रपट ३ मार्च रोजी डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

वारिसू:

थलपथी विजय आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'वारिसू' देखील 8 मार्च रोजी OTT वर प्रवाहित होईल. हा चित्रपट यापूर्वी 11 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता प्राइम व्हिडिओवर प्रवाहित होण्यासाठी सज्ज आहे.