
OTT Release This Week: पंख्याचा गार वारा अंगावर घ्या, मस्त सिनेमे पाहा! OTT देतेय सिनेमांची मेजवानी
OTT Release This Week: मे महिन्याचे शेवटे पंधरा दिवस उरले आहेत. उन्हाळ्यात आता तुम्हाला घरबसल्या ओटीटीवर तुमचे भरपूर मनोरंजन होणार आहे.
हा आठवडा खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.
अॅक्शन, रोमान्स, विनोद अशा वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत
'भोला', 'कटहल' ते 'बंदा' पर्यंत चित्रपट आणि वेब सीरिज OTT च्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. मार्च महिन्यात OTT वर प्रसारित 'हे' चित्रपट होणार आहेत. कधी, काय आणि कुठे प्रदर्शित होत आहे यावर नजर टाकूया...
कटहल:
नेटफ्लिक्स मूव्ही कटहल या सिरिजमध्ये सान्या मल्होत्रा ही मुख्य भुमिकेत आहे. ही सिरिज 19 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रवाहित होईल. कटहल हा एक सोशल कॉमेडी चित्रपट आहे ज्यात सान्या मल्होत्रा ही पोलीस अधिकारी आहे. कटहल च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
बंदा:
मनोज बाजपेयी स्टारर आगामी चित्रपट 'सिर्फ एक बंदा काफी है'चा रोमांचक आणि पॉवर पॅक्ड ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'सिर्फ एक बंदा काफी है', सत्य घटनांनी प्रेरित, अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित केलेला हा कोर्टरूम ड्रामा आहे. मनोज बाजपेयी यांचा हा चित्रपट 23 मे 2023 रोजी ZEE5 वर प्रदर्शित होईल.
भेडिया:
वरुण धवन आणि क्रिती सेननचा 'भेडिया' हा हिट चित्रपटांपैकी एक आहे. चाहते या चित्रपटाची OTT वर प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भेडिया 25 मे रोजी Jio Voot वर रिलीज होऊ शकतो. सुमारे 60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'भेडिया'ने जवळपास 67 कोटींची कमाई केली.
भोला
दृश्यम 2 च्या यशानंतर आता अजय देवगण पुन्हा एकदा पडद्यावर परतला आहे. 'भोला' चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.मे महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट प्राइमवर प्रदर्शित होईल. त्याची रिलीज डेट 25 मे ते 30 मे दरम्यान असण्याचा अंदाज आहे.
हिंदी मालिका आणि चित्रपटांव्यतिरिक्त, तुम्हाला मे महिन्याच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर अनेक हॉलीवूड सिरिज देखील पाहायला मिळतील. ज्यामध्ये सिटी ऑफ ड्रीम्सचा सीझन 3, अमेरिकन बॉर्न चायनीज, मॉडर्न लव्ह चेन्नई, झो किट्टी यांचा समावेश आहे.