शाहरुख गीतांजलीला म्हणाला 'आमचं भवितव्य तुझ्या हाती सुरक्षित आहे!'

वृत्तसंस्था
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

पहिल्या स्फूर्तिदायक आवृत्तीनंतर ‘स्टार प्लस’वरील ‘टेड टॉक्स इंडिया नई बात’चे निर्माते या कार्यक्रमाची दुसरी आवृत्ती सादर करण्याची तयारी करीत आहेत. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान हाच या कार्यक्रमाचा सूत्रधार म्हणून दिसणार आहे.

मुंबई : पहिल्या स्फूर्तिदायक आवृत्तीनंतर ‘स्टार प्लस’वरील ‘टेड टॉक्स इंडिया नई बात’चे निर्माते या कार्यक्रमाची दुसरी आवृत्ती सादर करण्याची तयारी करीत आहेत. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान हाच या कार्यक्रमाचा सूत्रधार या नात्याने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असून येत्या 2 नोव्हेंबर 2019 रोजीपासून या कार्यक्रमाचे प्रसारण सुरू होण्याची शक्यता आहे.

आपले मन फार कुतुहलजनक असून नवनव्या गोष्टी शिकण्याची आपली तयारी असते, असे शाहरूख खानने यापूर्वी वेळोवेळी दाखवून दिले आहे. यावेळी त्याला एका गीतांजली राव या केवळ 13 वर्षांच्या एका मुलीने चकित केले. लोकांचे जीव वाचविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून तिने दाखवून दिले की तंत्रज्ञानाच्या वापरात तुमचे वय आड येत नाही.
गीतांजलीने ‘टेथीस’ नावाच्या एका वाहून नेता येण्याजोग्या यंत्राचा शोध लावला असून ते तयार करण्यास फारसा थर्च येत नाही. त्या यंत्राद्वारे पाणी किती प्रदूषित आहे, ते दिसून येते. ताज्या पाण्याच्या ग्रीक देवतेचे नाव तिने या यंत्राला दिले असून मोबाईलशी जोडलेल्या त्यातील संवेदकाद्वारे आपल्याला तात्काळ पाण्याच्या शुध्दतेची माहिती मिळू शकते. गीतांजलीने यावेळी टेड टॉकच्या व्यासपिठावर या यंत्राचे प्रात्यक्षिक करून पाण्याची शुध्दता किती आहे, ते सर्वांना दाखवून दिले.

Image may contain: 2 people, people smiling, people standing

सुरुवातीच्या / सुरुवातीच्या काळात तिने 'एपिओन' नावाच्या उपकरणाने ओपिओइड व्यसनाचे निदान देखील केले आहे. तिच्या या प्रयोगाने प्रभावित झालेल्या शाहरूख खानने संगितले, “तिच्या वयाच्या मानाने तिने हे एक थक्क करणारं संशोधन केलं आहे. मी जेव्हा 13 वर्षांचा होतो, तेव्हा सुरक्षेसाठी दरवाजाला नीट कडी लावण्याची सूचना माझे पालक मला करीत असत. पण गीतांजलीसारख्या बुध्दिमान मुलांच्या हाती आपले भवितव्य नक्कीच सुरक्षित आहे, असं मला वाटतं.”

शाहरूखच्या म्हणण्यात तथ्य नक्कीच आहे! येत्या 2 नोव्हेंबरपासून रात्री 9.30 वाजता पाहा ‘टेड टॉक्स इंडिया नई बात’ फक्त ‘स्टार प्लस’वर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Our future is safe with you says shah rukh khan to gitanjali