'वयाच्या 9 व्या वर्षी लताजींबरोबर गायलं होतं गाणं'; अजूनही गायकीचा प्रवास सुरुच 

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 25 January 2021

1980 मध्ये कविता यांनी स्वरचित अपना गाना काहे को ब्याही (मांग भरो सजना) हे गाणं गायलं. चित्रपटात त्या गाण्याचा समावेश करण्यात आला नव्हता

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द गायिका म्हणून कविता कृष्णमुर्ती यांचे नाव घ्यावे लागेल. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीनं सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या कविता कृष्णमुर्ती यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. 90 ज्या दशकात प्रसिध्द गायिका म्हणून त्यांची छाप पडली ती अद्याप कायम आहे. त्यांनी गायलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. 

*  25 जानेवारी 1958 मध्ये दिल्लीतील एका अय्यर फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना गायनाचा मोठा छंद होता. त्यांचे वडिल शिक्षण विभागातील मोठे अधिकारी होते. त्यांच्या गायनाच्या शिक्षणाला सुरुवात घरापासूनच झाली.

*वयाच्या 8 व्या वर्षांपासून त्यांनी संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. 8 वर्षांचे असताना त्यांनी एका काव्यवाचनाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्यात सुवर्णपदक मिळवले होते. त्या स्पर्धेनं त्यांचे आयुष्य बदलले. तेव्हापासून त्यांनी आपल्याला मोठेपणी गायिका व्हायचे असे स्वप्न उराशी बाळगले.

*  कविता लहानपणापासूनच लता मंगेशकर आणि मन्ना डे यांची गाणी ऐकत असत. हे दोघेही त्यांच्या आवडीचे गायक.वयाच्या 9 व्या वर्षी लता मंगेशकर यांच्याबरोबर त्यांना गायनाची संधी मिळाली. त्यांनी त्यावेळी लताची यांच्याबरोबर एक बांग्ला गाणं गायलं होतं. कविता यांनी मुंबईतील सेंट झेवियरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आणि त्या जॉब शोधण्यासाठी बाहेर पडल्या.

PIX: Asha Bhosle, Kavita Krishnamurthy at an award function - Rediff.com  movies

* जेव्हा कविता यांची भेट हेमंत कुमार यांची मुलगी रानु मुखर्जी यांच्याशी झाली. तेव्हापासून त्यांना चित्रपटात गाण्याची संधी मिळु लागली. 
1971 मध्ये हेमंत कुमार यांनी त्यांना बोलावले आणि रविंद्र संगीताच्या चार ओळी शिकवल्या. त्यानंतर सांगितले की, थोडा वेळ बस तुला आता लताजी यांच्यासोबत गाणं गायचं आहे. पुढे लता दीदी यांच्यासोबत त्यांनी ते गाणं गायलं.

Kavita Krishnamurthy Wiki, Age, Husband, Children, Family, Biography & More  – WikiBio

* 1980 मध्ये कविता यांनी स्वरचित अपना गाना काहे को ब्याही (मांग भरो सजना) हे गाणं गायलं. चित्रपटात त्या गाण्याचा समावेश करण्यात आला नव्हता.

Kavita Krishnamurthy Wiki, Age, Husband, Children, Family, Biography & More  – WikiBio

*1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्यार झुकता नही चित्रपटापासून कविता यांनी गायला प्रारंभ केला. त्यानंतर एकामागोमाग त्यांची सुपरहिट गाणी रसिकांना आनंद देणारी ठरली. त्यांना चारवेळा सर्वोत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेयर अॅवॉर्ड मिळाला.

Better market for independent music now, says Kavita Krishnamurthy -  YesPunjab.com

*1942 अ लव्ह स्टोरी, याराना, खामोशी, देवदास या चित्रपटांसाठी त्यांना त्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते.

Singer Kavita Krishnamurthy, 61, met Hema Malini's mom, modified her life -  Sahiwal

* कविता यांनी प्रसिध्द व्हायोलिनवादक एल सुब्रमण्यम यांच्याशी 1999 मध्ये लग्नं केलं. सुब्रमण्यम यांचे पहिले लग्न झाले होते. मात्र त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाल्यानं त्यांनी दुसरा विवाह केला. आता कविता या फारशा चित्रपटात गात नसल्या तरी जगात विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत असतात. 

Indian Singers Kavita Krishnamurthy, L. Subramaniam Celebrate Classical  Music in NY | Bollywood | indiawest.com

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Padma Shri awardee popular singer Kavita Krushnamurti celebrating her 63th birthday