Pagalpanti Trailer : जॉनचा हा चित्रपट पहायला डोक्याची गरज नाही कारण...

pagalpanti trailer is out now
pagalpanti trailer is out now

मुंबई : बॉलिवूडचा फिटेस्ट हिरो जॉन अब्राहम आणि इलियाना डिक्रुज ही जोडी यापूर्वी कधीच एकत्र दिसली नव्हती, आता मात्र एका मजेशीर चित्रपटामधून ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. 'पागलपंती' असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला पाहिल्यावर वाटत आहे की हा चित्रपट कॉमेडीचा जबरदस्त धमाका असणार आहे. पागलपंती हा खऱ्या अर्थाने नावाला साजेशा असा चित्रपट ठरणार आहे. 

जॉन आणि इलियानाशिवाय या चित्रपटामध्ये अनिल कपूर, सौरभ शुक्ला, क्रिती खारबंदा, उर्वशी रोतेला,पुल्कित सम्राट आणि कॉमेडी मास्टर अगशद वारसी अशी दमदार कास्ट दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पात्रांचे पोस्टर रिलिज करण्यात आले होते. ट्रेलर हा फक्त कॉमेडीने भरपूर नाही तर सर्व कलाकारांचा अभिनयही तितकाच चांगला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काही वेळातच सोशल मीडियावर त्याला चांगलीच पसंती मिळाली आहे. 

पागलपंतीच्या ट्रेलरची सुरुवात एका जबरदस्त डायलॉगने होते, 'जास्त डोकं नका लाऊ कारण, यांच्याकडे नाही'. त्यानंतर जॉन, अरशद आणि पुल्कित यांच्या 'पागलपंती' ची कथा. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे प्रचंड ड्रामा, अॅक्शन आणि कॉमेडी अशी मेजवानी आहे. या चित्रपटातील अभिनेत्रींनीही उत्तम अभिनय आणि अदांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. उर्वशी, इलियाना आणि क्रिती या तिघींचा ट्रेलरमधला जलवा चित्रपटाची उत्सुकता वाढवणारा आहे. 

या चित्रपटाची एक खास चर्चा आहे ती सिनेमातील अभिनेत्री क्रिती खारबंदा आणि पुल्कीत सम्राट यांच्या अफेअरची. चित्रपटाच्या शुटिंग दरमय्यान अफेअरची अफवा सुरु होती. मात्र याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दोघांनी दिलेली नाही.

नो एंट्री, वेलकम, सिंग इज किंग, रेडी आणि मुबारकां या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेल्या अनीस बाजमी यांनी पागलपंतीचं निर्देशन केलं आहे. कॉमेडीने भरपूर असलेला हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com