'पहलवान' पाहता येणार पाच भाषांमध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 जुलै 2019

दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप आणि अभिनेता सुनील शेट्टीच्या 'पहलवान' चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील हा सर्वात बिग बजेट चित्रपट असणार आहे. येत्या 12 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप आणि अभिनेता सुनील शेट्टीच्या 'पहलवान' चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील हा सर्वात बिग बजेट चित्रपट असणार आहे. येत्या 12 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

"पहलवान'ची खासियत म्हणजे तमीळ, तेलुगु, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुनीलचा हा पहिलाच कन्नड चित्रपट आहे. या ऍक्‍शनपटाला कॉमेडीचाही टच देण्यात आला आहे. बॉलीवूडचा ऍक्‍शन मास्टर सुनील शेट्टी या चित्रपटात काय कमाल करतो हे पाहणंही औत्सुक्‍याचे ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pahalwan Movie can be Release in five languages