Indian Air Strike : पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारणार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या मागणीप्रमाणे, पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय यापूर्वी आम्ही घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी काही कठोर पाऊले सरकराने उचलावी, अशी आमची ईच्छा आहे.

मुंबई : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकारांना कोणत्याही चित्रपटात घेतल्यास त्याचे शूटिंग होऊ दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही म्युझिक कंपनीने पाकिस्तानी गायकाला घेतले तर गाणे प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (AICWA) दिला होता. 

यानंतर या बंदीनंतर आता पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारण्यात यावा, अशी नवी मागणी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (AICWA) तर्फे करण्यात आली आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या मागणीप्रमाणे, पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय यापूर्वी आम्ही घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी काही कठोर पाऊले सरकराने उचलावी, अशी आमची ईच्छा आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकार, फिल्म असोसिएशन आणि माध्यम प्रतिनिधी यापैकी कोणालाही व्हिसा मिळणार नाही, याची खबरदारी सरकारने घ्यावी. ही सविस्तर मागणी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने सरकारला केली आहे. यावेळी कलाकारांसह क्रिकेटर हरभजन, सहवाग, रैना, कैफ यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.

AICWA


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani actors visa will be cancelled in India