अनुष्कापेक्षा पाकिस्तानी अभिनेत्री भारी? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

कलाकारांची तुलना वेगवेगळ्या देशातील कलाकारांशी करण्यात आली आहे
pakistani actress ayemen saleem being compared to anushka sharma indian says mishi is more beautiful
pakistani actress ayemen saleem being compared to anushka sharma indian says mishi is more beautiful Team esakal

मुंबई - बॉलीवूडमध्ये अभिनेता किंवा अभिनेत्रीशी तुलना हा काही नवीन प्रकार नाही. यापूर्वी अनेक कलाकारांची तुलना वेगवेगळ्या देशातील कलाकारांशी करण्यात आली आहे. सध्या बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री अनुष्का शर्माची (Anushka sharma) तुलना ही पाकिस्तानी अभिनेत्री ऐमनशी (pakistani actress ayemen) करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आहे. त्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे. अनुष्काच्या चाहत्यांनी तिच्या बाजूनं किल्ला लढवत ठेवला आहे. मात्र ऐमनचेही चाहते काही कमी नाहीत. त्यांनीही अनुष्काची आणि तिची जोरदार तुलना चालवली आहे. सध्या हा ट्रेंडिंगचा विषय आहे.

बॉलीवूडमध्ये एकसारख्या चेह-यांची काही कमी नाही. यापूर्वी विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय सारखी दिसणा-या अभिनेत्रीचा मोठ्या प्रमाणात शोध सुरु असल्याचे दिसून आले आहे. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तान आणि अभिनेत्री ऐमन सलीमची(pakistani actress ayemen) चर्चा सुरु आहे. आणि विषय आहे अनुष्का शर्मा. (Anushka sharma) त्यात मजेशीर बाब अशी आहे की, भारतातील लोकांना ऐमन जास्त आवडली आहे. ऐमन ही पाकिस्तानी ड्रामा सीरिज चुपके-चुपके पासून चर्चेत आली आहे. त्या मालिकेला भारतातही पाहिले जाते. त्याचा मोठा फॅनफॉलोअर्सही आहे.

सोशल मीडियावर या दोन्ही अभिनेत्रींची तुलना व्हायला सुरुवात झाली आहे. काहींना अनुष्का भावली आहे तर काहींना ऐमन आवडली आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, ऐमन ही पाकिस्तानची अनुष्का असं लिहिलं आहे. एकानं लिहिलं आहे की, मी भारतातील असून युट्युबवर त्या व्हिडिवर नजर गेली असता त्या मालिकेची झलक मला पाहायला मिळाली. तर दुस-या फॉलोअर्सनं लिहिलं आहे की, मी भारताचा नागरिक आहे पण मला अनुष्कापेक्षा ऐमन जास्त भारी वाटते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची अभिनेत्री हिना खानही चर्चेत होती. लोकं तिला करिश्मा कपूरची कार्बन कॉपी असे समजतात.

pakistani actress ayemen saleem being compared to anushka sharma indian says mishi is more beautiful
'रामायणा'तील 'रावणा'च्या निधनाची अफवा; 'लक्ष्मणा'ने लिहिली पोस्ट
pakistani actress ayemen saleem being compared to anushka sharma indian says mishi is more beautiful
'छिछोरे'मधील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com