पल्लवी म्हणतेय लकी मी... 

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

इंडो ऑस्ट्रेलियन ब्युटी पल्लवी शारदा विद्या बालनच्या आगामी "बेगम जान' चित्रपटात काम करणार असल्याने भलतीच खूश आहे. आता विद्यासारख्या कसदार आणि हिट अभिनेत्रीबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्यानेच ती स्वतःला लकी समजतेय. पल्लवीने हवाईजादा, बेशरम या चित्रपटांतून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या आधी तिने ऑस्ट्रेलियन चित्रपटातूनही काम केले होते; पण विद्यासारख्या ग्रेट अभिनेत्रीबरोबर काम करण्यात मला धन्यता वाटते,असे पल्लवी सांगत सुटलीय.

तिच्यासारख्या अभिनेत्रीबरोबर झळकणे खूप भाग्याचे आहे. विद्या ही खूप चांगली अभिनेत्री आणि माणूस आहे. तिच्याबरोबर काम करण्याचा निर्णय हा करिअरमधला सर्वांत चांगला निर्णय होता, हे ही ती आवर्जून सांगतेय. बेगम जानमधल्या भूमिका खूपच डीप असल्याचेही ती सांगतेय. मी अशा मुलीची भूमिका करते आहे, जी स्वतःला खूप चांगली ओळखते. या भूमिकेला एक चढता ग्राफ आहे, ही भूमिका मिळणे माझ्या सारख्या अभिनेत्रीसाठी खूप महत्त्वाचे होते. प्रत्येक अभिनेत्रीला वेगवेगळे एक्‍सपरिमेंट करायचेच असतात आणि या चित्रपटातून मला ती संधी मिळाली आहे, असे पल्लवीचे म्हणणे आहे. 
 
Web Title: Pallavi says I am so Lucky I ...