Panchayat 3 : 'आम्ही तर जळालोय, मुंबईला आल्यावर कुणी ओळखेल का?' मंजूदेवींची 'पंचायत'!

पंचायतच्या पहिल्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
Panchayat 3
Panchayat 3 esakal

Neena Gupta shot Panchayat 3at 40 degree : टीव्ही मनोरंजन विश्वाची जागा आता ओटीटीनं घेतली आहे. या माध्यमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. कोरोनानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये देखील मोठे बदल झाले.त्यात ओटीटीला प्रेक्षकांची मिळालेली साथ यामुळे या माध्यमानं आता टीव्ही मनोरंजन, चित्रपट यावर मोठा प्रभाव टाकला आहे.

वेबसीरिजच्या दुनियेत काही हिंदी सीरिजची नावं ही ऑल टाईम बेस्ट सीरिज म्हणून घ्यावी लागतील. जसं की. अनुराग कश्यप दिग्दर्शित सेक्रेड गेम्स, डीके यांची द फॅमिली मॅन, मिर्झापूर, यानंतर पंचायत या मालिकेचे नाव घेता येईल. साधी कथा, पण त्याची प्रभावी मांडणी करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पंचायत या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

पंचायतच्या पहिल्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. जितेंद्र कुमार, रघुवीर यादव आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असलेली पंचायत सीरिज भारतात सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका आहे. फुलोरा गावात जे काही घडते ते इतक्या प्रभावीपणे दिग्दर्शकानं प्रेक्षकांसमोर आणले आहे की, त्यामुळे यापूर्वीच्या दोन्ही सीझननंतरही निर्मात्यांना तिसऱ्या सीझनची घोषणा करावी लागली.

Panchayat 3
Sameer Wankhede Case Updates : 'वानखेडेंनी आम्हाला कधीही....' SIT चा आता नवीन आरोप!

सध्या सोशल मीडियावर पंचायतशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी पंचायतच्या शुटींग दरम्यानचा अनुभव सांगितला आहे. तब्बल ४० डिग्री सेल्सिअस तापमान असताना देखील करावं लागलेलं चित्रिकरण खूपच त्रासदायक होतं. नीनाजी यांनी त्यांच्या खास शैलीत तो अनुभव सांगितला असून त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Panchayat 3
Scoop Web Serise : 'प्रियंका सोबत मी...' इतक्या वर्षांनी हरमन बावेजानं स्पष्ट सांगितलं!

पंचायत 3 च्या शुटिंगचा अनुभव सांगताना नीनाजी यांनी म्हटले आहे की, छत्री घेऊन देखील काही उपयोग होत नाही. त्याच्या आतून कडक ऊन्हाची धग जाणवते. आम्ही तर सगळे जळून गेलो आहोत. मुंबईला आल्यावर आम्हाला कुणी ओळखेल की नाही हीच मोठी शंका आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com