आशुतोष गोवारीकरांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिस तैनात! कारण वाचा...

वृत्तसंस्था
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

'पानिपत : द ग्रेट बिट्रेयल' या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर आशुतोष गोवारीकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. 

ऐतिहासिक चित्रपट आणि त्यावरून वाद हे ठरलेलं समीकरण आहे. दिग्दर्शक लिबर्टी घेऊन किंवा कलात्मक विचार करून त्या चित्रपटात बदल करतात व समाजतला एक कोणतातरी समूह त्यावर नाराज होतो व सुरू होतं धमक्यांचं सत्र. असंच काहीसं घडलंय आशुतोष गोवारीकरांसोबत. 'पानिपत : द ग्रेट बिट्रेयल' या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर आशुतोष गोवारीकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. 

Panipat : सदाशिवरावभाऊ विरूद्ध अहमद शाह अब्दाली; गाजणार मोठी लढाई

Image result for panipat poster

गोवारीकरांना अनेक संघटनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. यामुळे त्यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी 200 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पानिपतमधील काही घटनांसोबत छेडछाड केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या चित्रपटातील काही दृश्य हे चुकीचे आहे, त्यामुळे या संघटनांनी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या संघटनांपासून धोका पोहोचू नये यासाठी गोवारीकरांनी पोलिस सुरक्षा मागितली आहे, अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

Panipat Trailer : 'मैं इस धरती के मिट्टी के एक कण के लिए भी मरने को तय्यार हूँ!'

या सर्व पार्श्वभूमीवर गोवारीकर म्हणाले, 'ऐतिहासिक चित्रपट तयार करताना, कथेत कोणता भाग दाखविण्यात येणार यावरून वाद होऊ शकतात. इतिहासाच्या पुस्तकात बरीच पाने असतात, पण प्रत्येक गोष्ट तशाच प्रकारे चित्रपटात दाखविणे शक्य नसते. त्यामुळे असे वाद होऊ शकतात.' पानिपतमध्ये अर्जून कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत तर क्रिती सेनन पार्वतीबाईंच्या भूमिकेत दिसेल. 6 डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'पानिपतची तिसरी लढाई'
पानिपतची तिसरी लढाई ही मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. 14 जानेवारी 1761 ला हरियानातील पानिपत येथे ही लढाई झाली होती. सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी ही लढाई लढली होती. या लढाईत अहमद शाह अब्दालीच्या सैन्याने मराठा सैन्याचा पराभव केला होती.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panipat Director Ashutosh Gowariker Protected By 200 Police