Panipat movie posters
Panipat movie posters

Panipat : अर्जुन कपूर आणि क्रिती सॅननच्या जबरदस्त लुकचे पहिले पोस्टर रिलिज

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानिपत' या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच लॉन्च झाले. तर अभिनेता संजय दत्त याने आज (ता. 4) पानिपतमधील त्याचा अहमद शाह अब्दालीचा फर्स्ट लूक शेअर केलाय. पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व मराठ्यांमध्ये झाली होती. भारदस्त रूपातला संजय दत्त हा अहमद शाह अब्दालीच्या रूपात शोभून दिसतोय. त्याचसोबत आता चित्रपटातील मुख्य भुमिकेतील असणाऱ्या अर्जुन कपूर आणि क्रिती सॅनन यांच्या लुकचा पोस्टरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

पानिपतच्या ऐतिहासिक लढाईवर तयार होणाऱ्या या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर सदाशिव राव तर क्रिती सॅनन पार्वती  बाईच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्या लुकमधील पोस्टर अर्जुन आणि क्रितीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. काही वेळातच प्रदर्शित झालेल्या या पोस्टर्सना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. 
पार्वतीबाईंच्या लुकमधील क्रितीचा पोस्टर शेअर करताना क्रितीने लिहिलं, ' खऱ्या राणीला कोणत्या मुकुटाची गरज नसते'. तर, अर्जुनने फोटोला कॅप्शन देताना लिहिलं,'सदाशिवराव भाऊ - एकटे असतानाही ज्यावर तुमचा विश्वास आहे त्या गोष्टीसाठी लढण्यातच शौर्य आहे'.

सदाशिव राव भाऊ मराठा सेनेचा सेनापती आहे आणि या भूमिकेतील अर्जुन कपूरचा लुक जबरदस्त आहे. सदाशिव राव भाऊंची पत्नी म्हणजेच पार्वती बाई आणि तिच्या भूमिकेतील क्रिती मराठमोळ्या अंदाजात दिसत सुंदर दिसत आहे. चंद्रकोर टिकली आणि नथ असा तिचा लुक पार्वती बाईंच्या भूमिकेला न्याय देत आहे. 

'पानिपतची तिसरी लढाई'

पानिपतची तिसरी लढाई ही मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. 14 जानेवारी 1761 ला हरियानातील पानिपत येथे ही लढाई झाली होती. सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी ही लढाई लढली होती. या लढाईत अहमद शाह अब्दालीच्या सैन्याने मराठा सैन्याचा पराभव केला होती.1 नोव्हेंबरला पानिपत या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले. संजय दत्तसह या चित्रपटात अर्जून कपूर, क्रिती सेनन, झीनत अमान, मोहनीश बेहेल हे कलाकार दिसतील. ऐतिहासिक चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आशुतोष गावारीकर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष आता पानिपतकडे लागले आहे. उद्या (ता. 5) या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होईल. तर 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com