पंकज-हृतिक पुन्हा एकत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा हृतिक रोशनबरोबर रुपेरी पडद्यावर एकत्रित काम करताना दिसणार आहे. हृतिकच्या सुपर 30 या चित्रपटात पंकज खलनायकाच्या भूमिका साकारताना दिसेल.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा हृतिक रोशनबरोबर रुपेरी पडद्यावर एकत्रित काम करताना दिसणार आहे. हृतिकच्या सुपर 30 या चित्रपटात पंकज खलनायकाच्या भूमिका साकारताना दिसेल.

अनेक कॉमेडी भूमिका केल्यानंतर पंकजने पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेसाठी होकार दिला आहे. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या हृतिकच्या अग्निपथ सिनेमात पंकजने खलनायकाची भूमिका केली होती. एवढंच काय तर पंकजच्या या भूमिकेसाठी त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसादही मिळाला. सुपर 30 चित्रपटातील पंकजची भूमिका अधिक प्रभावशाली असणार आहे. तसंच त्याने यासाठी खास मेकओव्हरदेखील केला आहे. पुन्हा एकदा हृतिक आणि पंकज ही जोडी रुपेरी पडद्यावर काय कमाल करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pankaj and hritik again together