Mirzapur 2 : जो आया है वो जाएगा भी, बस मर्जी हमारी होगी; 'कालीन भैया' इज बॅक

वृत्तसंस्था
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

अमेझॉन प्राईमनेही मिर्झापूर सीझन 2 चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मिर्झापूरला एक वर्ष पूर्ण झाले आणि हे एक दमदार वर्ष होते.

मुंबई : जो आया है वो जाएगा भी, बस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर के चाहनेवालोंके सालगिराह मुबारक हो, असा खतरनाक डायलॉग घेऊन ऍमेझॉन प्राईम मिर्झापूर या आपल्या पहिला सुपरहिट वेब शोचा दुसरा सिझन घेऊन येत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

ऍमेझॉन प्राईमने शनिवारी मिर्झापूर 2 चा टीझर प्रदर्शित केला आहे. पहिल्या सिझनला एक वर्ष पूर्ण झाले. याच निमित्ताने अमेझॉन प्राईमकडून मिर्झापूर 2 वेब शोची एक झलक प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केली आहे. विशेष म्हणजे या टीझरच्या माध्यमातून अभिनेता पंकज त्रिपाठी उर्फ कालीन भैयाने इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. यू ट्यूबवरील टीझरमध्ये कालीन भैया व मुन्ना यांच्यातील संवादही प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या नव्या सिझनमध्ये कालीन भैया आणि गुड्डू (अली फझल) यांच्यातील थेट लढाई पहायला मिळणार हे नक्की आहे. 

सत्ताढोंग (श्रीराम पवार)

अमेझॉन प्राईमनेही मिर्झापूर सीझन 2 चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मिर्झापूरला एक वर्ष पूर्ण झाले आणि हे एक दमदार वर्ष होते. मिर्झापूर हा एक असा शो आहे ज्याच्या माध्यमातून मला प्रेक्षकांकडून प्रेम आणि प्रशंसा मिळाली. या शोमुळे मला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. मी जिथे पण जातो तिथे लोक मला कालीन भैया नावाने आवाज देतात. सिझन 2 साठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे चित्रपट कधी प्रदर्शित होणार, असे मला लोक नेहमी विचारतात. प्रेक्षकांप्रमाणे मी पण सीझन 2 प्रदर्शित होण्यासाठी उत्सुक आहे. मिर्झापूरला आज (16 नोव्हेंबर) वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्ताने आम्ही मिर्झापूर सीझन 2 चा टीझर लाँच केला आहे. त्यासोबतच मी माझे इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले आहे”, असे पकंज त्रिपाठी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaj Tripathi debuts on Instagram with Mirzapur 2 teaser