मनोज वाजपेयीचा 'तो' किस्सा सांगताना पंकज त्रिपाठीला आले रडू !

वृत्तसंस्था
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

'द कपिल शर्मा शो' दरम्यान चालेल्या चर्चेमध्ये मनोज यांनी पकंजविषयी एक किस्सा सांगितला ज्यामुळे पकंजला अश्रू आवरले नाही.

मुंबई : मेहनत आणि कष्ट करुन स्वबळावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलेल्या कलाकारांची अनेक उदाहरणे आहेत. असं असलं तरी मात्र सध्या 'नेपोटिझम' ची प्रथा असल्याची टीका अनेकांकडून केली जाते. या सर्वांना मागे टाकत बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंटस्ट्रीमध्ये उशीरा पदार्पण करुनही चाहत्यांच्या मनामध्ये घर तयार केलं आहे. अभिनेता पकंज त्रिपाठी हे नावसुध्या त्या यादीत समाविष्ठ आहे.

'द कपिल शर्मा शो' च्या नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी आणि कुमार विश्वास एकत्र दिसले. कुमार विश्वास यांच्या 'फिर से मेरी याद' या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी पकंज आणि मनोज आले होते. शोदरम्यान चालेल्या चर्चेमध्ये मनोज यांनी पकंजविषयी एक किस्सा सांगितला ज्यामुळे पकंजला अश्रू आवरले नाही. पटनामध्ये एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हॉटेलमध्ये आलेल्या मनोजची चप्पल पकंजने घेतली होती आणि ती परत केली नाही. किस्सा सांगताना मनोज म्हणाला,' जेव्हा आम्ही गॅंग्स ऑफ वासेपूर चित्रपटासाठी शूटिंग करत होतो तेव्हा पकंज माझ्याकडे आला आणि त्याने कबूल केलं की त्यावेळी मुद्दामच ती चप्पल त्याने घेतली होती.'

हा संपूर्ण किस्सा समजवताना पकंज त्रिपाठी म्हणाला, 'मी स्ट्रग्लिंग काळामध्ये पटनाच्या एका हॉटेलमध्ये कैंटिन सुपरवाइजर म्हणून काम करत होतो. त्यावेळी मनोज वाजपेयी शूटिंगदरम्यान त्या हॉटेलमध्ये राहण्यास आला होता. हे समजल्यावर मी प्रचंड उत्साहित झालो. मी हॉटेलमध्ये सर्वांना सांगून ठेवलं होतं की, मनोज यांच्या रुममधून कोणतीही ऑर्डर आली तर मीच जाणार. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. ते हॉटेलमधून बाहेर पडल्यावर लक्षात आलं की ते चप्पल विसरले आहेत. मी हॉटेलमध्ये विनंती केली की ही चप्पल परत करु नका मी ती आर्शीवाद आणि आठवण म्हणून माझ्याजवळ ठेवेन.' मात्र हा किस्सा सांगताना पंकज भावूक झाला आणि त्याला अश्रू आवरले नाही. त्यानंतर मनोजने त्याला मिठी मारली. 

या एपिसोडचा व्हिडीओ शेअर करताना पकंजने कॅप्शनमध्ये लिहिलं,'जीवनात खूपवेळा भेटवस्तू मिळतात मनौज भैया. एकलव्यसारखचं मी त्या चप्पलांमध्ये पाय ठेवेन'. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaj Tripathi tears up talking about his love for Manoj Bajpayee