पंकज उदास यांची "मदहोश' गझल मैफल 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

सुरेश वाडकरांच्या हस्ते अल्बमचे प्रकाशन 

सुरेश वाडकरांच्या हस्ते अल्बमचे प्रकाशन 

मुंबई : प्रख्यात गझल गायक पंकज उदास यांची "मदहोश' ही विशेष संगीत मैफल येत्या शनिवारी (ता. 25) रात्री 8.30 वाजता विलेपार्ले येथील भाईदास ऑडिटोरियममध्ये रंगणार आहे. पंकज उदास यांच्या "मदहोश' या अल्बमचे गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते प्रकाशनही होणार आहे. या वेळी पंकज उदास यांच्या गाण्यांची मैफल रंगणार आहे. 
"मदहोश' हा नवीन अल्बम आहे आणि त्यात अनवट अशा सहा गझल आहेत. या अल्बममधून पंकज उदास यांनी खास त्यांच्या शैलीतील गीते सादर केली आहेत. या नवीन अल्बमबद्दल पंकज उदास म्हणाले की, "मला या अल्बमवर काम करताना खूप समाधान मिळाले, कारण ही भूतकाळात घेऊन जाणारी पंकज उदास शैली आहे आणि नेमकी हीच गोष्ट माझ्या चाहत्यांना बऱ्याच काळापासून हवी होती, असेही मला ते करताना जाणवले.' दरम्यान, या कार्यक्रमाच्या प्रवेशिका www.bookmyshow.com या वेबसाईटवर बुक करता येतील.  

Web Title: Pankaj udhs consert