परमित सेठीचे विनोदी मालिकांना प्राधान्य 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

अभिनेता-दिग्दर्शक परमित सेठी लाईफ ओके वाहिनीवरील "हर मर्द का दर्द' या विनोदी मालिकेचे दिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी त्याने "सुमित सॅंभाल लेगा' या मालिकेच्या काही भागांचे दिग्दर्शन केले होते. एक अभिनेता म्हणून त्याला भूमिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. पण, दिग्दर्शन करताना विनोदी मालिकेला तो प्राधान्य देतो. विनोदी मालिका आवडत असल्याचे परमित सेठीने सांगितले. "निर्मात्यांनी या मालिकेसंदर्भात माझ्याकडे प्रस्ताव दिला, तेव्हा या मालिकेला आपण अधिक काही देऊ शकतो, असे मला वाटले. मला या मालिकेची संकल्पना आवडली.

अभिनेता-दिग्दर्शक परमित सेठी लाईफ ओके वाहिनीवरील "हर मर्द का दर्द' या विनोदी मालिकेचे दिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी त्याने "सुमित सॅंभाल लेगा' या मालिकेच्या काही भागांचे दिग्दर्शन केले होते. एक अभिनेता म्हणून त्याला भूमिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. पण, दिग्दर्शन करताना विनोदी मालिकेला तो प्राधान्य देतो. विनोदी मालिका आवडत असल्याचे परमित सेठीने सांगितले. "निर्मात्यांनी या मालिकेसंदर्भात माझ्याकडे प्रस्ताव दिला, तेव्हा या मालिकेला आपण अधिक काही देऊ शकतो, असे मला वाटले. मला या मालिकेची संकल्पना आवडली. त्यात या मालिकेचे बजेट चित्रपटाच्या तोडीचे होते आणि बाह्य चित्रीकरण बरेच असल्यामुळे मी हा प्रस्ताव स्वीकारला. 
 

Web Title: Paramita Sethi prefer comedy series