मागील पानावरून पुढे... 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

"परदेस मे है मेरा दिल' ही मालिका तीन-चार महिन्यांचा लीप घेणार आहे; पण मालिकेत काही विशेष बदल करण्यात येणार नाहीत. म्हणावी तशी लोकप्रिय नसलेली ही मालिका अर्जुन बिजलानी आणि दृष्टी धम्मी यांच्या मध्यवर्ती भूमिकेमुळे काहीशी चर्चेत असते. त्यांनी साकारलेले राघव आणि नैना प्रेक्षकांना आवडतात; पण मालिका टीआरपीच्या स्पर्धेत मागे पडतेय. एकता कपूरचे प्रॉडक्‍शन हाऊस असलेल्या मालिकांना लीप घेणे तसे नित्याचेच. तसे ते याही मालिकेत घेतले जाणार आहे; पण याविषयी मालिकेतील कलाकारांना अजून काही सांगण्यात आलेले नाही, असे अर्जुन बिजलानीने सांगितले.

"परदेस मे है मेरा दिल' ही मालिका तीन-चार महिन्यांचा लीप घेणार आहे; पण मालिकेत काही विशेष बदल करण्यात येणार नाहीत. म्हणावी तशी लोकप्रिय नसलेली ही मालिका अर्जुन बिजलानी आणि दृष्टी धम्मी यांच्या मध्यवर्ती भूमिकेमुळे काहीशी चर्चेत असते. त्यांनी साकारलेले राघव आणि नैना प्रेक्षकांना आवडतात; पण मालिका टीआरपीच्या स्पर्धेत मागे पडतेय. एकता कपूरचे प्रॉडक्‍शन हाऊस असलेल्या मालिकांना लीप घेणे तसे नित्याचेच. तसे ते याही मालिकेत घेतले जाणार आहे; पण याविषयी मालिकेतील कलाकारांना अजून काही सांगण्यात आलेले नाही, असे अर्जुन बिजलानीने सांगितले. सध्याच्या ट्रॅकनुसार राघव मेहराच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडतात आणि नैना त्याला उत्तम प्रकारे साथ देतेय. लवकरच या मालिकेत "नागिन'फेम अभिनेत्री अदा खानची एंट्री होणार आहे; पण एकूणच फार काही बदल न होता ही मालिका मागील पानावरून पुढे, असेच म्हणता येईल; पण नैना आणि राघवची अदाकारी पाहण्याची मात्र प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असेल.  

Web Title: pardes mein mera dil