तुम्ही चुकीचा अर्थ घेतलात; पाकिस्तानी चॅनलबाबत परेश रावल यांचे स्पष्टीकरण

टीम ई सकाळ
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई : काही दिवसांपूर्वी परेश रावल पुन्हा एकदा चर्चेत आले. यावेळी कारण होते, ते त्याच्या पाकिस्तान प्रेमाचे. आपल्याला पाकिस्तानी चित्रपट आवडतात आणि आपल्याला अशा सिनेमांमध्ये काम करायला आवडेल अशा आशयाची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. रावल यांनी आज त्यावर आपले नेमके मत मांडून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

यावर आपले मत देताना ते म्हणाले, मुळात मी असे बोललो नव्हतो. पाकिस्तानी चॅनलवर चालू असलेली हमसफर ही मालिका मला आवडते. इतकेच मी बोललो होतो. यावर मला तिथे काम करावेसे वाटते असे काहीही बोललो नव्हतो. 

माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला असे त्यांचे म्हणणे होते. अरूंधती राॅय यांच्या विधानाबाबत काही विचारणा झाल्यावर मात्र काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. तो विषय आता संपला आहे. त्यावर बरीच चर्चा झाली आहे, असे त्यांच्या टीमकडून सांगण्यात आले. 

Web Title: Paresh rawal on pak chanel esakal news