
Parineeti - Raghav Wedding : लक्ष्मी - नारायणाचा जोडा! परिणीती - राघवचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न
परिणीती - राघवच्या लग्नाचा पहिला फोटो समोर
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता होती. दिवसभर चाहते सोशल मिडीयावर आणि विविध माध्यमांतुन दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ बघत होते. अखेर रात्री उशीराने का होईना परिणीती - राघवच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आलाय. परिणीतीच्या भांगेत कुंकू दिसत तिने खास पंजाबी ड्रेस परिधान केलेला दिसतोय. तर राघव काळ्या रंगाच्या वेस्टर्न सूटमध्ये दिसत आहे. दोघांचा जोडा अगदी खुलून दिसतोय.
परिणीतीच्या बिदाईला वाजलं कबीरा गाणं
परिणीती - राघवच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच उदयपूरमधील ज्या लीला पॅलेसमध्ये परिणीताचा लग्नसोहळा सुरु आहे तिकडचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत कबीरा गाणं लग्नसोहळ्यात सुरु असुन परिणीताची पाठवणी सुरु आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे
परिणीताच्या मेहंदीच्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा लग्नसोहळ्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अशातच परिणीती आणि राघव यांच्या मेहंदी सोहळ्यातले फोटो व्हायरल झालेत. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये परिणीतीने फोटोसाठी पोझ दिलेली दिसत असुन तिच्या हातावर मेहंदी रंगली आहे.
लग्नविधींना सुरुवात, सोहळ्यात वाजलं हटके गाणं
परिणीती - राघवच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. या दोघांच्या लग्नसोहळ्यात राघव की हुईं परिणीति.. हे खास थीम सॉंग वाजवण्यात आलं. हे गाणं परिणीती - राघवच्या लग्नसोहळ्याचं प्रमुख आकर्षण झालंय. दोघे थोड्याच वेळात एकमेकांना वरमाला घालतील
परिचा राजकुमार वऱ्हाड घेवुन निघाला
परिणीती - राघवच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत उदयपूर पॅलेसबाहेर असलेल्या नदीतून बोटीमधून बॅंड-बाजा आणि वरात जात असलेली दिसून येतेय.
लग्नाआधी समोर आली राघव चढ्ढाची पहिली झलक
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाच्या लग्नाची थोड्याच वेळात संपन्न होणार आहे. अशातच परिणीती - राघवच्या लग्नाआधी नवरदेवाची म्हणजेच राघव चढ्ढाची पहिली झलक समोर आलीय. यात राघव पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत रुबाबदार दिसतोय.
आज राजनीती नाही तर राघनीती, आदित्य ठाकरे
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. अशातच राजकारणी आदित्य ठाकरे परिणीती आणि राघवच्या लग्नासाठी उदयपूरला पोहोचले आहेत. उदयपूर एअरपोर्टवर पोहोचताच मिडीयाशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आज राजनीती नाही तर राघनीती आहे. मला खुप आनंद होतोय, या दोघांना लग्नासाठी शुभेच्छा" अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिलीय.
परिणीती - राघवच्या लग्नाची ग्रॅंड तयारी
परिणीती - राघवच्या लग्नाची ग्रॅंड तयारी सुरु झालीय. ज्या ठिकाणी लग्नसोहळा रंगणार आहे तिथे कामगार आणि इतर टीम लग्नाचा मंडप उभारण्याची जोरदार तयारी करत आहेत
परिणीती - राघवच्या लग्नाला आदित्य ठाकरे राहणार उपस्थित?
परिणीती - राघवच्या लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. अशातच विरल भयानीने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे स्पॉट झाले असून आदित्य परिणीती - राघवच्या लग्नासाठी उदयपूरला रवाना झाल्याची शक्यता आहे.
असा आहे परिणीती - राघवच्या लग्नाचा कार्यक्रम
परिणीती - राघवच्या शाही लग्नसोहळ्याच्या विधींवर नजर टाकली तर आज दुपारी एक वाजता राघवला सेहरा बांधला जाईल. तर दोन वाजता लग्नाची वरात निघेल. आणि अखेर दुपारी 3.30 वाजता दोघांच्या वरमाला होतील.
तर चार वाजता दोघेही सात फेरे घेतील आणि संध्याकाळी 6.30 वाजता परिणीतीची पाठवणी होईल. तर रात्री 8: 30 वाजता उदयपुर मधील हॉटेल लीला आणि ताज लेक पॅलेस इथे या कपलचे रिसेप्शन असणार आहे.
आज परिणीती चोप्रा - राघव चढ्ढाचा शाही लग्नसोहळा संपन्न होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासुन दोघांच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता होती. काहीच महिन्यांपुर्वी दोघांनी एकमेकांसोबत साखरपूडा केला.
अखेर आज २४ सप्टेंबरला दोघे एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांचे नातेवाईक, मित्रमैत्रीण लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी घाई करत आहेत. उदयपूरला लीला पॅलेस येथे हा शाही लग्नसोहळा रंगणार आहे.