'प्रियांका माझी बहीण आहे तरीही..'

सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

परिणिती चोप्रा हे नाव आता बाॅलिवूडला नवं उरलं नाही. यशराज बॅनरमध्ये अकाउंट सांभाळणारी परिणिती बघता बघता स्टार झाली. आता गोलमाल अगेन या चित्रपटातून ती झळकली आहे. या निमित्ताने तिच्याशी बऱ्याचदा मीडीया बोलतो आहे. ती आज स्टार झाली असली तरी अनेक जण प्रियांका चोप्राची चुलत बहीण म्हणून तिला ओळखतात. या ओळखीचा तिने सूचक शब्दात समाचार घेतला.

मुंबई : परिणिती चोप्रा हे नाव आता बाॅलिवूडला नवं उरलं नाही. यशराज बॅनरमध्ये अकाउंट सांभाळणारी परिणिती बघता बघता स्टार झाली. आता गोलमाल अगेन या चित्रपटातून ती झळकली आहे. या निमित्ताने तिच्याशी बऱ्याचदा मीडीया बोलतो आहे. ती आज स्टार झाली असली तरी अनेक जण प्रियांका चोप्राची चुलत बहीण म्हणून तिला ओळखतात. या ओळखीचा तिने सूचक शब्दात समाचार घेतला.

आपल्या आणि प्रियांकाबाबत बोलताना परिणिती म्हणाली, 'प्रियांका माझी चुलत बहीण आहे. ते मी मान्य करतेच. पण आज माझीही आपली अशी ओळख आहे. प्रियांका माझी बहीण कायमच राहणार आहे. त्याला मी नाकारत नाही आहे. पण आता इतकी वर्षं झाल्यानंतर मला माझं अस्तित्व दिसू लागलं आहे ही चांगली बाब आहे. आणि हे मी प्रयत्नपूर्वक केलं. माझ्या करिअरच्या वाटचालीत मी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. धाडसी निर्णय घेतले त्यामुळेच मला माझं अस्तित्व गवसलं. आणि यापुढेही मी अशाच भूमिका करणार आहे.'

परिणिती आजवर प्रियांकाबद्दल फार बोलली नव्हती. या दोघींनीही आपल नातं मीडियापासून लांब ठेवलं होतं. आता ती या नात्याबद्दल का बोलते आहे, ते मात्र कळायला मार्ग नाही. 

 

Web Title: pariniti chopra priyanka chopra bollywood esakal news